महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : विरोधकांच्या पोटात दुखतेय

BJP : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडीवर टीका

Nagpur News : लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीला पोटदुखी सुरू झाली आहे. संपूर्ण राज्य कर्जबाजारी होईल, अशी टीका केली जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेते आता टेंट लावत आहेत. काँग्रेसचे आमदार शिबिर घेत आहेत. त्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र हे अर्जही चुकीच्या पद्धतीने भरून घेण्यात येत असल्याची टीका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

मुनगंटीवार म्हणाले, राजकीय गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. राजकीय गुन्हे माघार घेण्यासाठी समिती निर्णय घेणार आहे. जीवित हानीशी संबंधित गुन्हे सोडून उर्वरित गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेता येतात. न्यायालयाच्या अटीनुसार यात आमदार, खासदारांवरील गुन्हे मागे घेता येत नाहीत, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची केलेली टिप्पणी विडंबनात्मक आहे. त्यांनी उदाहरण देताना काही मुद्द्यांवर भाष्य केले असेल. त्याला दुसऱ्या अर्थाने घेण्याचे काहीही कारण नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.

खोटे बोलण्याला मर्यादा हवी

राज्य सरकारकडे पैसेच नाहीत. त्यामुळे सरकार बिकेसीची जमीन विकणार आहे. अशा प्रकारचे खोटे बोलण्यात येत आहे. हे कोण्या विचारवंताने सांगितले, याचा शोघ घेतला जावा. विरोधकांची भूक बरीच भयंकर आहे. ही भूक बकासुरपेक्षाही जास्त आहे. सत्तेची ही भूक आहे. विरोधक प्रचंड खोटे बोलतात. परंतु खोटे बोलण्यालाही मर्यादा असायला हवी, असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला. नामांतराच्या विषयावरही त्यांनी भाष्य केले. छत्रपती संभाजी महाराजांना वेदना देणाऱ्या औरंग्याचे नाव कायम ठेवण्यासाठी इतका खटाटोप कशासाठी? सत्तेला चाटणाऱ्या लोकांनी राजकारण केले. अफजलखानाच्या आणि औरंगजेबाचे उदातीकरण त्यांनी केले. पण आम्ही असे उदात्तीकरण सहन करणार नाही. मतांसाठी असे राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. असेही मुनगंटीवार म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी अभ्यासपूर्वक बोलण्याची गरज आहे. दहा वर्षात 20 हजार किलोमीटरचे रस्ते झालेत. त्यानंतरच काहीच मिळाले नाही असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे. कोल्हे अभ्यास करीत करीत नसल्याचे यावरून दिसून येते. अभ्यास केल्याशिवाय कोणीही बोलू नये, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिली. मावळमध्ये बाळा भेंगडे यांच्या बंडखोरीवरही मुनगंटीवार यांनी आपले मत व्यक्त केल. भेंगडे यांच्या मनात काही असल्यास त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) समजावून सांगतील. प्रत्येकाने स्वतःच्या मताने निर्णय घ्यायला सुरुवात केली, तर महायुती अडचणीत येईल. असेही ते म्हणाले.

इको सेन्सेटिव्ह झोनबाबत 2010 मध्ये अभ्यास सुरू झाला. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनात भारत सरकारचा पर्यावरण विभाग काम करीत आहे. भारत सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केला. त्यानुसार काम सुरू असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूदक केले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण तयार होत आहे. यापूर्वी 2010 मध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण तयार झाले. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. धोरण कपाट बंद करण्यासाठी नसतात. कॅबिनेटमध्ये मान्यता होताच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. राज्याच्या नव्या धोरणाला मान्यता मिळताच त्याची अंमलबजावणी सुरू होईल. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी काम केले जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!