Buldhana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रगती महासत्तेकडे नेण्यासाठी अर्थसंकल्प सादर करतांना भविष्यातील 2047 पर्यंत देश विविध क्षेत्रात आर्थिक महासत्ता होईल. हा वेध घेऊन केंद्रिय अर्थमंत्री सितारामण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी महिला शेतकरी तरूण यांना विविध योजना व रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. चार कोटी बेरोजगांराना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांचा रेल्वे, मेट्रो, औद्यागिक, नदी पूर्णविकास प्रकल्प, ग्रामीण रस्ते आरोग्य सेवा, दुष्काळग्रस्तांसाठी पंतप्रधान मुद्रा योजना, शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना, गृहनिर्माण यासह सर्वांगिण विकास साधण्यासाठी अर्थसंकल्प हा देशाला समृद्ध करणारा ठरणार असल्याचे भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे 29 जुलै रोजी सांगितले आहे.
2047 मध्ये भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठी प्रत्येक वर्षी औद्योगीकरण, महिला, शेतकरी यांच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे. 2014 पासून भविष्यात शस्त्रास्त्र गरज कमी पडू नये, आपल्या देशातच तयार झाले पाहिजे. इतर देशाची प्रगती ज्या माध्यामातून झाली आहे. त्याकडे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच दिले नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, असे संजय कुटे म्हणाले.
सक्षम महिला, प्रगतीशील देश
आमदार संजय कुटे पुढे म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थसंकल्प समजतो. परंतू शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना अर्थसंकल्प समजत नाही, तेच जास्त टिका करतात. मध्यमवर्गांसाठी कर आकरणी मोठा दिलासा देण्यात आला आहे. महिला सक्षम होतील तरच देश प्रगती करेल. महिलांच्या विकासासाठी व्यवसायाच्या दृष्टीने अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहे. शेतीला आधुनिक नैसर्गिक करण्यासाठी एक कोटी शेतकर्यांना अनुदानाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
रस्त्याप्रमाणेच रेल्वे मार्गातून शेतीमाल मोठ्या शहरापर्यंत पोहचण्यासाठी रेल्वे प्रकल्पावर 15 हजार 940 कोटीरुपये मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेल्या वाटपापैकी 13.5 पट अधिक निधी देण्यात आला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेद्वारे महाराष्ट्रातील 128 स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पांना सुद्धा भरीव तरतूद करण्यात आली आहे.
नदी पुर्नविकास प्रकल्प, ग्रामीण रस्ते तसेच दुष्काळ ग्रस्त विदर्भ, मराठवाडासाठी 600 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन वैद्यकीय व कृषी महाविद्यालय, प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, नदीजोड प्रकल्प वैनगंगा, नळगंगा यामुळे शेतीविकासासोबत देशभरातील अतिवृष्टी दुष्काळ यासाठी लाभदायक राहणार आहे. कर्नाटक आणि गुजरातपेक्षा दुप्पट निधी महराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप निरर्थक आहेत, असे संजय कुटे यांनी स्पष्ट केले.
बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे 29 जुलै रोजी अर्थसंकल्प या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार संजय कुटे यांच्यासह भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, जिल्हा उपाध्यक्षा विजया राठी, सिद्धार्थ शर्मा, भाजप युवा मोर्चाचे सोहम झाल्टे उपस्थित होते.