महाराष्ट्र

NCP Politics : अजित पवार गटाला परभणीत दे धक्का!

Babajani Durrani : राष्ट्रवादीचा मोठा नेता शरद पवारांकडे परतला?

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणाऱ्यांपैकी बरीच मंडळी आता परतीच्या मार्गावर आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश बघून हा निर्णय घेतला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मंडळी स्वपक्षात जाताना दिसून येत आहेत. यामध्ये आता परभणीतून एका मोठ्या नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात घरवापसी होत असल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मराठवाड्यात मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी (दि.२७) रात्री छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांच्या भेटीची नुकतीच बातमी समोर आली होती. तसेच बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीत सहभागी झाले. तिथे त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागलं. यानंतर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं. हे सगळं घडत असतानाच आता खुद्द बाबाजानी दुर्राणी हे छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारांच्या भेटीला काल दाखल झाले होते. विशेष म्हणजे बाबाजानी दुर्राणी यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं मध्यमनाशी बोलतांना सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यात अनेक राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पाथरीत बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनास आल्यामुळे वेगळे चित्र बघायला मिळाले. तूर्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी हे गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षात अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाशी त्यांची बोलणी चाललेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जर काही शब्द मिळाला तर बाबाजानी हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील अशी परिस्थिती आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी मतदारसंघात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत.

काय म्हणाले बाबाजानी दुर्राणी?

आम्ही शरद पवार यांना भेटायला आलो होतो. मी शरद पवारांच्या नेतृत्वात भविष्यात काम करणार आहे. 1985 पासून मी शरद पवारांसोबत आहे. मध्यंतरी थोडं आठ-दहा महिन्यांचं डायव्हर्जन झालं. समविचारी पक्षांसोबत काम करणं योग्य आहे, अशी भावना बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली.

इथं काम करणं कठीण?

‘ज्याठिकाणी कार्यकर्ते, नेता आणि मतदारांमध्ये मतभेद होतात तिथे काम करणं कठीण होऊन बसतं. अजित पवार सध्या समविचारी पक्षांसोबत नाहीत. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करणं कार्यकर्त्यांना अवघड होतं. पण सुबह का भूला शाम को लौट जाए तो उसे भूला नहीं कहते. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे’, अशी प्रतिक्रिया बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

पाथरीतून विधानसभेचे मागितले तिकीट

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी आता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार हे जवळपास स्पष्ट झालंय. परभणीत जयंत पाटलांच्या बैठकीला बाबाजानी दुर्राणींचे पुत्र जुनैद दुर्राणी हजर होते. वडिलांसाठी पाथरीतून विधानसभेचं तिकीटही मागितलं. विशेष म्हणजे या बैठकीच्या एक दिवसआधीच बाबाजानी दुर्राणींच्याच घरी जयंत पाटील आले होते. जयंत पाटलांनी दुर्राणींच्या घरी जेवणंही केलं आणि आता दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जयंत पाटलांकडे जुनैद दुर्राणींनी तिकिटाची मागणीही केली. तर जयंत पाटलांनीही सत्कारात्मक प्रतिसाद दिलाय.

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी ?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी हे अजित पवारांसोबत आले. त्यांची नुकतीच विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म संपलीय. पुन्हा त्यांनी विधान परिषदेचं तिकीट मागितलं होतं. पण पुन्हा अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांकडे परतण्याचा निश्चय बाबाजानी यांनी केल्याचं दिसतंय. बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना वि धान परिषदेवर आमदार केलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!