महाराष्ट्र

Chandrapur Flood : मुनगंटीवारांचा फोन अन् पुरपीडितांच्या खात्यात पैसे जमा !

Sudhir Mungantiwar : पूरग्रस्तांना दिलासा देण्यात अशीही तत्परता

पालकमंत्री मुनगंटीवार पूरग्रस्तांची विचारपूस करत आहेत. त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या प्राथमिक मदतीची माहिती देत आहेत. ‘आर्थिक मदत मिळणार’ असे सांगितल्यावर पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले. सरकारी मदत म्हणजे वाट बघण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटत असावे. मुनगंटीवार यांना लगेच लक्षात आले. त्यांनी अधिकाऱ्यांना फोन केला. सूचना दिल्या आणि काही वेळातच पूरग्रस्तांना पैसे जमा झाल्याचा बँकेचा मेसेज येतो.

एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे वाटणारा घटनाक्रम चिचपल्ली आणि पिंपळखुट येथील पूरपीडितांनी अनुभवला. संवाद साधत असतानाच मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. काही वेळातच पूरग्रस्तांना पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला लागला. बघता बघता चिचपल्ली येथील 224 तर पिंपळखुट येथील 109 लोकांच्या खात्यात पैसे जमा देखील झाले.

चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे तलाव फुटल्यामुळे 300 घरांमध्ये पाणी शिरले. घरातील साहित्य वाहून गेले. अनेक संसार उघड्यावर आले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अलीकडेच याठिकाणी भेट दिली आणि गावकऱ्यांची विचारपूस केली.

ज्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्याचे पंचनामे फोटो आणि व्हीडीओ घ्या. नुकसान झाले पण आज घर पडलेले नसेल. कदाचित उद्या किंवा दोन दिवसांनी ते घर पडू शकते. अशाही घरांचे पंचनामे करावे आणि मदत द्यावी. पंचनाम्यापासून एकही घर सूटणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

मामा तलाव फुटला

गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अश्यात चिचपल्ली येथे मामा तलाव फुटल्याने 300 घरांमध्ये पाणी शिरले. प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. नागरिकांनी पालकमंत्र्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यानंतर मंत्र्यांनी पहाटेच अधिकाऱ्यांना फोन केला आणि मदतकार्याचे आदेश दिले होते.

पूरग्रस्तांच्या पाठिशी

या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पोहचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपिडीतांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभा राहील, असा शब्द मुनगंटीवार यांनी दिला. पुरामुळे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पूरपीडितांना चहा-बिस्कीटसह नाश्ता व उत्तम जेवण द्यावे. नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणीक यासोबतच कपडे देण्यात येईल. तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्था करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

साथीचे आजार पसरू शकतात

‘पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. तसेच पावसानंतर साथरोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी. तसेच नालेसफाई, बोअरीग, विहीर आदींमध्ये ब्लिचींग पावडरची फवारणी करावी. ज्या नागरिकांचे धान्य, भांडे, बकऱ्या, बैलजोडी वाहून गेली, त्यांची यादी करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!