महाराष्ट्र

Pravin Darekar : मराठा समाजाने सातबारा दिलाय का?

Manoj Jarange Patil : आमदार प्रवीण दरेकर यांनी केला सवाल

Maratha Reservation : अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलने केली. बलिदान दिले. अनेकांनी मराठा समाजासाठी काम केले. मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या एका भूमिकेवर बोललो तर संपूर्ण मराठा समाजाचा अपमान कसा काय होतो. मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केला आहे का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे. जरांगे यांनी सबुरीने घेण्याची गरज आहे. तुम्ही मॅनेज होत नाहीत हिच तुमची ताकद, सामर्थ्य आहे. हे मराठा समाजाला माहित आहे. त्यामुळेच समाज पाठीशी उभा आहे, असे ते म्हणाले. 

मनोज जरांगे यांना कोणी काही बोलले तर त्याला शिवराळ भाषा, एकेरी, हमरीतुमरी बंद केले पाहिजे. स्वतःची वक्तव्य मुजोरपणासारखी वाटतात. दुसऱ्याला मुजोरडा, माजोरडा बोलायचे हे अयोग्य आहे. एका आंदोलनाच्या यशामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नांचे नेतृत्व करा. सरकार मराठा समाजासाठी काय करत आहे ते कालच्या कार्यक्रमात दिसलेआहे. मराठा समाजासाठी ज्यांनी पहिले बलिदान दिले ते अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी पुस्तिका तयार केली. एक लाख बेरोजगार मराठा तरुणांना उद्योजक बनवले ते देखील जाहीर केले, असे दरेकर म्हणाले. 

Parliament Session : विकसित भारत निर्माण करण्यासाठी पायाभरणी

सरकार गंभीर

मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक आहे. परंतु आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो, त्याची दखल घेण्याऐवजी शिवराळ भाषा वापरली जात आहे. आम्ही 20 वर्षे राजकारणात आहोत. आम्ही संघर्षातून तयार झालो आहोत. गरीब कुटुंबातून येऊन प्रगती केली. सगळेच शिव्या सहन करणारे नसतात. संयमाने बोला. मागण्या ताकदीने मांडा. आम्ही सोबत आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत यावे. सत्तेत येऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. सत्तेत आल्यावर दिरंगाई का होते, त्याची कारणेही त्यांना समजतील. विशिष्ट लोकांना नजरेसमोर ठेऊन आपले ‘टार्गेट’ करू नये. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निवडून आले तर चालतील. शिंदे-पवार यांचे चालतील. भाजपा आणि फडणवीस यांचे उमेदवार पाडणार. त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’ असा संशयही दरेकरांनी व्यक्त केला. 

जरांगे यांचा उद्देश हा भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना संपवणे हा आहे का? मराठा समाज हा सर्व पक्षात आहे. समाजात विभाजन होऊ नये यासाठी लोक शांतत आहेत. पण मी बोलेन तेच समाज, या अविर्भावातून जरांगे यांनी बाहेर यायला हवे. जरांगे महाविकास आघाडीचा बचाव करीत आहेत. त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसच्या नेत्यांना विचारायला हवे. ओबीसीतून (OBC) मराठा आरक्षण देण्यावर भूमिका काय? या तीनही पक्षांना काहीच विचारायचे नाही, असे त्यांचे सुरू असल्याचे दरेकर म्हणाले. 

Maratha Reservation : फडणवीसांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे

सरकारला सर्व जातीधर्मांना एकत्रित करून निर्णय घ्यावा लागतो. जरांगे यांनी संयमाने आंदोलन करावे. आक्रमक भुमिका घ्यावी. जागतिकस्तरावर मराठा समाज आपली शक्ती शांततेच्या मार्गाने दाखवू शकतो. सरकारवर दबाव आणून न्याय मिळवू शकतो, हा संदेश गेला आहे. प्रश्न सोडविण्यासाठी शिवराळ भाषा योग्य नाही.

प्रमुख घटक पक्ष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असले तरी भाजपा हा सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आहे. भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, हे आम्ही कधीही नाकारत नाही. आपल्या नेतृत्वाखाली सरकार येणार असे जर अमित शहा (Amit Shah) म्हणाले तर त्याचा वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. त्याच अधिवेशनात राज्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोण मुख्यमंत्री होणार याच्या चर्चा बंद करा, मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असे सांगितल्याचेही दरेकर यांनी लक्षात आणून दिले.

पुन्हा बोलणे अयोग्य 

अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारेच त्यांनी शरद पवार यांच्यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर पुन्हा बोलणे योग्य नाही. प्रत्येक नेता पक्षाला ताकद देण्यासाठी भूमिका घेतो. महायुतीबाबत भाजप आणि सहयोगी पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. विधानसभा (Assembly Election) एकत्र लढणार आहोत ते स्पष्ट असल्याचेही दरेकरांनी म्हटले. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कायद्याचा अभ्यास जास्त झाला आहे. त्यांना अटक झाली होती. ते जेलमध्ये जाऊन आलेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास नीट झालेला आहे. राऊत यांच्या वक्तव्याला अजिबात किंमत द्यायचे नाही, असे ठरविले आहे. त्यांचे कुठलेही वक्तव्य संदर्भहीन असते. तुमच्या घरातल्या माणसांना तुम्हाला टिकवता आले नाहीत. हा तुमचा कमकुवतपणा आहे. स्वतःचा कमकुवतपणा लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे हा संजय राऊत यांचा नित्यक्रम झाला असल्याचा टोलाही दरेकरांनी लगावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!