UPSC In Action : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयएएस पूजा खेडकर यांची बनवेगिरी एका ट्विटमुळे उघडकीस आली आहे. एका तरुणाने केलेल्या ट्विटमुळे पूजा खेडकर यांच्या प्रकरणाने देशात खळबळ उडवून दिली. या आता प्रकरणात केंद्रीय लोकसेवा आयोगालाही दखल घ्यावी लागली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) त्याची दखल घेतली आहे. पूजा खेडकर यांची नोकरीच आता धोक्यात आली आहे. यूपीएससीने पूजाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पूजाला आयएएस रद्द का करु नये? अशी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे वैभव कोकाट. कोकाट यांनी याबाबत ट्विट केले होते. एका ट्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. असे कोकट म्हणाले.
पुणे येथे असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या प्रकाशझोतात आल्या. त्यांच्या अवास्तव मागण्या आणि कारनामे एखाद्या बड्या अधिकाऱ्यालाही लाजवतील एवढे होते. त्यानंतर या प्रकरणात त्या चर्चेत आल्या. पूजा खेडकर नेमक्या आहेत कोण आहे? हे काही दिवसांपूर्वी कोणालाच माहीत नव्हते. पुण्यात असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला. हा अहवाल हाती लागल्याचे वैभव कोकाट म्हणाले. हा अहवाल वाचल्यावर एक प्रशिक्षणार्थी असे कसे करू शकतात असा प्रश्न कोकाट यांना पडला.
पोस्ट प्रचंड व्हायरल
पुणे येथील जिल्हाधिकारी यांनी अहवाल पाठवला होता. त्याला वाचा फोडली वैभव कोकाट यांनी. पूजा खेडकर प्रकरणात त्यांनी सोशल मीडियावर मत मांडले. पूजा खेडकरचा शोध घेताना तिने ऑडी कारवर बेकायदा अंबरदिवा लावल्याचे लक्षात आले. त्याचे फोटो कोकाट यांना मिळाले. त्यांनी हे फोटोही ट्विट केले. 6 जुलै रोजी वैभव यांनी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात पोस्ट टाकली. त्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते यांचे वैभवला फोन आलेत. पूजा खेडकर संदर्भात अनेक माहिती वैभव यांच्याकडे येऊ लागल्याचे वैभव यांनी सांगितले. याप्रकरणानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केले.
Maratha Reservation : धो..धो.. पावसात जरांगे यांचे पाचव्यांदा उपोषण
वैभव यांच्या एका ट्विटने सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. वैभव बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड आहे. त्यांनी एका जनसंपर्क कंपनीत काम केले आहे. एक्सवर त्याचे 31 हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. वैभव यांनी या प्रकरणानंतर पुन्हा एका ट्विट केले आहे. एका ट्विटमध्ये मोठी ताकद असते. आपण निर्भिडपणे लिहिले पाहिजे. काळ कठीण असला, तरीही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरे बोलले पाहिजे. व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे, असे वैभव यांनी म्हटले आहे.