Application For New Scheme : राज्यभरात दीड लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दरमहा दीड लाख रुपये मिळणार आहे. यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यभरात लाखो महिलांकडून अर्ज केले जात आहेत. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 1.10 लाख अर्ज दाखल झाले आहेत. यात 70 हजार ऑफलाइन तर 40 हजार अर्ज ऑनलाइन दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी, यासाठी सरकारने आता दोन समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्आला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख 97 हजार 651 संभाव्य पात्र महिला आहेत.
मोठ्या संख्येत अर्ज
बुलडाणा तालुक्यात 11 हजार 264 अर्ज दाखल झालेत. त्यात ऑफलाइन अर्ज 9 हजार 299 आहेत. ऑनलाइन अर्ज 1 हजार 965 आहेत. चिखली तालुक्यात 10 हजार 513 अर्ज आतापर्यंत आले आहेत. त्यात 7 हजार 708 अर्ज ऑफलाइन आहेत. ऑनलाइन अर्जांची संख्या 2 हजार 805 आहे. देऊळगावराजा तालुक्यात 11 हजार 130 अर्जांमध्ये 8 हजार 426 ऑफलाइन अर्ज आहेत. ऑनलाइन अर्जांची संख्या 2 हजार 704 आहे. सिंदखेडराजा 6 हजार 39 महिलांनी अर्ज दाखल केले. त्यात 3 हजार 396 अर्ज ऑफलाइन आहेत. 2 हजार 643 अर्ज ऑनलाइन आहेत.
लोणार तालुक्यात 9 हजार 658 लाभार्थी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 4 हजार 862 अर्ज ऑफलाइन आहेत. 4 हजार 796 अर्ज ऑनलाइन आहेत. मेहकर तालुक्यात 17 हजार 170 बहिणींनी अर्ज केला आहे. त्यात ऑफलाइन अर्जांची संख्या 10 हजार 756 तर ऑनलाइन अर्जांची संख्या 6 हजार 414 आहे. मोताळा तालुक्यात 6 हजार 684 महिलांनी एकूण अर्ज सादर केले. त्यातील 2 हजार 723 अर्ज ऑफलाइन आहेत. 3 हजार 961 महिलांनी ऑनलाइन अर्ज दिले आहेत. मलकापूर तालुक्यात 6 हजार 403 अर्जांमध्ये 4 हजार 703 ऑफलाइन अर्ज आहेत. ऑनलाइन अर्जांचा आकडा 1 हजार 700 आहे.
योजनेसाठी प्रतिसाद
नांदुरा तालुक्यात 6 हजार 231 महिलांनी अर्ज सादर केले. त्यात ऑफलाइन अर्ज 3 हजार 909 आहेत. ऑनलाइन अर्ज 2 हजार 322 आहेत. शेगाव तालुक्यात 3 हजार 889 महिलांचे अर्ज प्रशासनाला मिळाले आहेत. त्यात 2 हजार 95 अर्ज ऑफलाइन आहेत. ऑनलाइन अर्ज 1 हजार 764 आहेत. खामगाव तालुक्यात 7 हजार 932 प्राप्त झालेत. त्यात 5 हजार 246 अर्ज ऑफलाइन आहेत. ऑनलाइन अर्ज 2 हजार 686 आहेत. जळगाव जामोद तालुक्यात 5 हजार 950 अर्ज दाखल झालेत आहेत. येथे ऑफलाइन 2 हजार 721 आणि ऑनलाइन 3 हजार 229 अर्ज आहेत. संग्रामपूर तालुक्यात 7 हजार 916 लाभार्थी अर्ज आले आहेत. यात 4 हजार 166 ऑफलाइन अर्ज आहेत. ऑनलाइन अर्जांची संख्या 3 हजार 750 आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन्ही स्वरूपात अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदार महिला स्वत: मोबाइल ॲपवरून अर्ज सादर करू शकतात. ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालयात ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाइन अर्ज करीत आहेत. सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रामध्येही विनामूल्य अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. लाभार्थी म्हणून निवड झाल्यावर महिलांच्या बँक खात्यात थेट 1 हजार 500 रूपये जमा होणार आहेत. सध्या या अर्जासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.