महाराष्ट्र

Assembly Election : भाजप आता रोज दिसणार मीडियासमोर

BJP Politics : प्रत्येक विभागात नेत्यांची नियुक्ती

War For Maharashtra Mantralay : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे रण जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. जो महासंग्राम लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत जिंकता आला नाही, ते युद्ध विधानसभा (Vidhab Sabha) निवडणुकीत जिंकण्याचा ठाम निर्धार भाजपने केला आहे. याासाठी महाराष्ट्र भाजपने दररोज मीडियासमोर येण्याचे ठरविले आहे. यासाठी पत्रकार परिषद, प्रसार माध्यमांना मुलाखत देण्यात येणार आहे. माध्यमांना सामोरे जाण्यासाठी भाजपने आता नेत्यांची जम्बो यादी तयार केली आहे.

दिवसातून दोनदा भाजपचे नेते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. संवादासाठी दोन टप्प्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळी चार वाजता हे नेते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सकाळच्या सत्रात आमदार आशिष शेलार, रावसाहेब दानवे, आमदार पंकजा मुंडे, आमदार प्रवीण दरेकर हे माध्यमांशी दररोज बोलतील. सायंकाळच्या सत्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशेाक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, माधव भंडारी, आमदार अतुल भातखळकर, आमदार राम कदम हे संवाद साधतील.

विभागनिहाय प्रवक्ते

प्रत्येक विभागातील प्रसार माध्यमांशी संपर्कात राहण्याचा निर्धारही भाजपने केला आहे. यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार धनंजर महाडिक, आमदार संभाजी निलंगेकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आदमार संजय कुटे, आमदार प्रवीण दटके यांची निवड करण्यात आली आहे. आमदार राम शिंदे, श्रीकांत भारतीय, आमदार अमित गोरखे, अॅड. उज्ज्वल निकम हे देखील वेळोवेळी माध्यमांशी चर्चा करतील.

Prakash Ambedkar : मनोज जरांगे यांनी विधानसभा रिंगणात उतरावे

भाजपचे प्रवक्ता आशिष देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रीय प्रवक्ता हिना गावित, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार निरंजन डावखरे, अमित साटम, अॅड. अनिकेत निकम यांचीही विभागस्तरावर नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच दररोज सकाळी माध्यमांशी बोलतात. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रचाराला आता भाजप दिवसातून दोनदा प्रत्युत्तर देणार आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने 20 नेत्यांच्या तगड्या टीमची घोषणा केली आहे.

दररोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपमधील चार नेत्यांची टीम असेल. सायंकाळी चार वाजता सहा नेत्यांची टीम बोलेल. विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर हे नेते देणार आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या अपप्रचाराला मतदार बळी पडल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी चौफेर मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद कमी पडली. काँग्रेसने (Congress) बाजी मारली. विशेषत: विदर्भात भाजपला फटका बसला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी प्रत्येक विभागात नेत्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!