महाराष्ट्र

IAS Puja Khedkar : सरकारनंतर आता यूपीएससीकडून कारवाई

UPSC Action : गुन्हा दाखल करण्यासह बजावली कारणे दाखवा नोटीस

Show Cause Notice : महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांची चौकशी सुरू आहे. अशात आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच त्याची दखल घेण्यात आली आहे. खेडकर यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. खेडकर यांना यूपीएससीने ‘आयएएसची निवड का रद्द करु नये?’ अशी नोटीस बजावली आहे. सोबतच यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) याप्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले होते. लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसूरीकडून त्यांना तातडीने परत बोलवले आहे. पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे. वडिलांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्यापुढे अडचणींचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे गाजत आहेत. विवीध कारणांमुळे पूजा खेडकर वादग्रस्त ठरल्या आहेत. विविध पातळीवर पूजा खेडकर यांची चौकशी करण्यात येत आहे. अशात यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याची तयारीही सुरू आहे. खेडकर यांची सिव्हिल सर्व्हिसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सेवा परीक्षा-2022/ नागरी सेवा परीक्षा-2022 मधील नियमांनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. भविष्यात त्यांच्यावर परीक्षा व निवडीसाठी बंदी देखील घालण्यात येणार आहे.

Assembly Election : राजकीय पक्षांमध्ये सुरू झाला बैठकांचा सपाटा

वाशिममध्येच तळ ठोकून

पूजा खेडकर सध्या वाशिममध्येच तळ ठोकून आहेत. वाशिम मधील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत त्या मुक्कामी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना नोटीस बजावत त्यांनी सादर केलेली दस्तावेज खोटी असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कारवाई का करण्यात येऊ नये? अशा आशयाची नोटीस बजावली आहे. यूपीएससीच्या नोटीसनंतर काही वेळातच वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण यांनी वाशिमच्या शासकीय विश्रामगृहावर पूजा खेडकरांची भेट घेतली. ही भेट कार्यालयीन कामासाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. भेटीतील तपशिल अद्याप समोर आलेला नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाने बजावलेल्या नोटीससंदर्भात तर ही भेट झाली नाही ना? असा प्रश्न आहे.

पूजा खेडकर यांना सरकारने कार्यमुक्त केले आहे. त्यापूर्वी त्यांनी वाशिम पोलिसांमध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या ही तक्रार चौकशी आहे. खेडकर यांनी यापूर्वी वरिष्ठांकडे किंवा सरकारकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही तक्रार केलेली नव्हती. मात्र अचानक एकापाठोपाठ कारवाईला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी वाशिम पोलिसात तक्रार दिली. राज्यभरात सध्या खेडकर यांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!