महाराष्ट्र

Ajit Pawar : आमचं राज्य.. रयतेचं राज्य!

Mahayuti : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने जिंकली मने

Satara : अनेकांनी भारतात राज्य केले. निझाम, मोगल, आदीलशाह यांची नावं घेता येतील. पण महाराजांच्या राजवटीचा सगळ्यांना अभिमान आहे. महाराजांचं राज्य भोसलेंचं राज्य म्हटलं गेलं नाही. तर रयतेचं राज्य असा उल्लेख झाला. आजही सामान्यांसाठीच हे सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सातारा येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘आवर्जून सांगतो, ना झूठ है ना गद्दाही है ना नियत मे मक्कारी है महाराज के सेवक है, वादा निभाना हमारी जिम्मेदारी है’ या शब्दांत अजितदादांनी महायुतीच्या कार्यपद्धतीचा उल्लेख केला.

काही चांगलं घडत असेल तर खोडा घालण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. टीका टिपणी करतात. ते लंडनला गेल्यावर वाघनखं संग्रहालयात बघतात. कोहीनूर हिरा बघतात. पण आज महायुती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली तर लगेच त्यांच्या पोटात दुखायला लागलं, असा टोला अजितदादांनी लगावला.

सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला आणि ही ती वाघनखं आज इथे आली आहेत, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. वाघनखांच्या प्रेरणादायी इतिहासातून नवीन पिढीला ऊर्जा मिळाली पाहिजे, असं अजितदादा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि इतिहास निर्माण झाला. आपल्याला आईवडीलांनी या सुंदर जगात आणले. पण या जगाचा निरोप घेण्यापूर्वी एकदातरी त्या वाघनखांना डोळ्यानं बघता यावं, असं प्रत्येक शिवभक्ताचं स्वप्न होतं.

आज ते स्वप्न पूर्ण झालं, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. तरूण तरूणींना मदत करण्याचा प्रयत्न केला. दुधाचे अनुदान वाढवले. वीजमाफीचा उल्लेख केला. ती घोषणा शेतकऱ्यांसाठी वतदान ठरणार आहे. लाडकी बहीण योजना दिली. चांगल्या योजना देऊनही त्यावर टीका टीपणी करण्याच प्रयत्न विरोधक करत आहेत, असेही अजितदादा म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम त्यांच्या नावाला साजेसं असे सुरू झालं आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला स्मारक करीत आहोत. मागच्या राज्यकर्त्यांना असं करायचं सुचलं नव्हतं. पण या सरकारने कामं सुरू केली आहेत. महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपये देणार आहे, असेही ते म्हणाले.

Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाले पालकमंत्री?

शंभुराज देसाईंनी प्रस्ताव द्यावा, सरकार निधी देईल. 1000 कोटींचे साताराचे मेडीकल कॉलेज दिले. उशीरा झाला. पण कारण सातारकर कमी पडले तर आम्ही काय करणार? यशवंतराव चव्हाणांनी संरक्षण मंत्री असताना मिल्ट्री स्कूल काढले. त्यालाही काही कोटी लागतात. दर्जेदार सैनिक आज तयार होत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

निधीची अडचण नाही

अजिंक्यताराला 10 कोटी दिले. शंभुराज देसाईंनी आधी 10 कोटी खर्च करावे. मग आणखी पैसै देऊ. प्रतापगड, अजिंक्यतारा गडांना, जलपर्यटन, निसर्गपर्यटनाला आम्ही चालना दिली आहे. 500 कोटी रुपये या सर्व कामांना उपलब्ध करून दिली आहेत. निधीची अडचण येणार नाही. त्यासाठी येत्या विधानसभेत महायुतीचे सरकार आणावे लागेल. मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

आमच्याकडे दुर्लक्ष करू नका

लोकसभा निवडणुकीत आपण आमच्याकडे दुर्लक्ष केलं. विधानसभा निवडणुकीत असं करू नका. अनेकांनी वेगवेगळ्या बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. पण आमचा विश्वास आहे, असे अजितदादांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांना सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!