महाराष्ट्र

NCP : भुजबळांच्या भेटींनंतर शरद पवार आक्रमक !

Sharad Pawar : आरक्षणाबाबत घेतली ठोस भूमिका

Maratha Reservation : छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांच्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत त्यांनी ठोस भूमिका जाहीर केली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर आरोप केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते शरद पवारांच्या भेटीला गेले. छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. कुणाला ही राजकीय भेट वाटली, तर कुणी म्हणाले भुजबळ माफी मागायला गेले असावेत. याशिवाय भुजबळांची घरवापसी होतेय की काय, अशीही शंका बळावली. विशेष म्हणजे या भेटीमुळे अजितदादाच स्वगृही परतणार आहेत का, असा सवालही करण्यात आला.

गुरुवारी (दि.१८) बारामतीत बोलताना शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त बारामतीमध्ये आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. त्यांनी आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. धनगर आरक्षणासंदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय.

मधोजी शिंदे धनगर आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. त्याला आम्ही पूर्ण मदत करणार आहोत, असं शरद पवारांनी जाहीर केलं. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील भाषण संपल्यानंतर शरद पवार पुन्हा व्यासपीठावर आले. भाषण संपल्यानंतर माईकवरून त्यांनी ही घोषणा केली आहे, हे विशेष. सुप्रीम कोर्टातील लढण्यासाठी पूर्ण मदत करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

Maratha Reservation : जरांगेंची जीभ घसरली!

महाराजांनी ‘भोसलेंचे राज्य’ म्हटले नाही

आजचा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे. लोकांनी दिलेलं राज्य लोकांसाठी कसं वापरायचं याचा आदर्श अनेकांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष उल्लेख करता येईल. देशात अनेक राजे होऊन गेलेत. पण, 300 वर्षांनंतर सुद्धा महाराजांचं नाव घेतलं जातं. त्यांनी सामान्य माणसांसाठी राज्य स्थापन केलं. भोसल्यांचे राज्य म्हणून कधी त्यांनी सांगितलं नाही. ते सामान्य रयतेचे राजे म्हणून वावरले. हा इतिहास आहे. अनेक संकट आली तेव्हा त्याची चिंता केली नाही. पाण्याच्या विहिरी काढून उपेक्षितांना मदत केली, असं शरद पवार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!