महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : दूध उत्पादकांचा प्रश्न ‘गॅस’वर?

Milk : मंत्री विखे-पाटलांची प्रक्रिया केंद्रांना साद; तोडगा निघेना

Mumbai :  राज्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न अद्याप ‘गॅसवरच’ आहे. दूग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आता अतिरिक्त दूधाच्या संकलनासाठी प्रक्रिया केंद्रांना साद घातली आहे. प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्यास दूध उत्पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्य होईल, असेही विखे-पाटलांना वाटत आहे.

राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवायचा आहे. अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रीया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्र्यांनी केले आहे. या प्रक्रीया केंद्रांनी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशिल आहे. दूधाला जास्‍तीत जास्‍त भाव कसा देता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नासाठी उपाययोजना करण्‍याचे काम सुरु आहे, असेही विखेंनी स्पष्ट केले आहे.

विखे-पाटलांनी घेतली बैठक

मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासोबतच दूग्‍ध व्‍यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड आणि विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

35 रुपये दराचे आवाहन

दूध उत्‍पादक शेतक-यांना 3-5, 8-5 फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला 35 रुपयांचा दर लागू करावा असे आवाहन मंत्र्यांनी केले. दर लागू करण्‍यासाठी काही अडचणी असल्‍यास विभागाकडून सोडविण्‍यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल अशी ग्‍वाही विखे पाटलांनी दिली.

Sadabhau Khot : सदाभाऊ, उधारीचे काय झाले?

केंद्र सरकारकडे प्रस्ताव

सद्य परिस्थितीत राज्‍यात अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रक्रिया केंद्रानी २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे. यातून शेतकऱ्यांच्‍या दूधाचा प्रश्‍न मार्गी लागेल. आर्थिक नुकसानही टळेल. त्यामुळे दूधाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठविला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमीत शाह यांना धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची विनंती आपण केली असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!