संपादकीय

IAS officer : लबाडी करण्याचा डाव उघड

Washim : मागे लागला चौकशीचा फेरा

या लेखात प्रकाशित झालेली मते लेखकांची आहे. द लोकहित त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.

IAS Officer Pooja Khedkar : समाजात आपल्याला दोन प्रकारची माणसे बघायला मिळतात. पहिल्या प्रकारातील व्यक्ती व त्यांचा समूह सरळमार्गी, सर्व नियमांचे पालन करून जीवन जगणारा असतो. कोणत्याही परिस्थितीत अशा व्यक्ती चुकीचे वागत नाहीत. लबाडी करीत नाहीत. स्वतःच्या बळावर व कष्टावर पुढे जाणे त्यांना पसंत असते. प्रयत्नांची कास धरून या व्यक्ती मार्गक्रमण करतात. आपल्या सोबत इतरांचेही भले व्हावे अशी त्यांची भावना असते. अशा व्यक्ती स्वतः आनंदी आणि समाधानी राहतात. आपल्यावर सोपवलेले कार्य निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडतात. अशा व्यक्तीविषयी समाजात आदरभाव असतो

रंग बदलणाऱ्या व्यक्ती 

दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती स्वार्थी प्रवृत्तीच्या, स्वतःचा विचार करणाऱ्या, वेळ बघून रंग बदलणाऱ्या असतात. सोयीनुसार ते नियमांची व्याख्या बदलतात. वेगवेगळ्या तडजोडी करतात. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी जोखीम पत्करून पात्रता नसताना पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले कोणीच वाकडे करू शकत नाही, आपण निवडलेला मार्ग योग्य आहे, अशा अविर्भावात या व्यक्ती वावरतांना दिसतात. अचानक त्यांचे बिंग फुटले तर त्या कमालीच्या अडचणीत येतात. त्यातून सावरण्यासाठी मग त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले पूजा खेडकर व त्यांचे कुटुंबीय याच अवस्थेतून जात आहेत. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अतिशहाणपणाचा आविर्भाव त्यांच्या अंगलट आला आहे. स्वतःच्या गाडीवरील लाल दिव्याचा हव्यास बूमरॅंग होऊन त्यांच्यावरच उलटला आहे.

आरोपांची श्रृंखला..

स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरल्याने त्यांच्याकडे सर्व प्रथम लक्ष वेधले गेले. नंतर पुजा खेडकर यांचे बरेच किस्से समोर आले. खोटी प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे. खोटे आर्थिक उत्पन्न दर्शवून त्यांनी यासाठीच्या योजनांचा शिक्षण व नोकरीसाठी लाभ घेतला, असेही समोर आले आहे. त्यांच्यावरील आरोपांची श्रृंखला वाढतच आहे. आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दृष्टीदोष तसेच मानसिक आजार असल्याचे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा चिकित्सकाकडून मिळवले. त्याची चौकशी करण्याची मागणी एका आरटीआय कार्यकर्त्याने केली आहे.

नैतिक गुणवत्ता तपासली जावी -अरूण भाटिय

सनदी सेवेमध्ये मुले नुसती परीक्षा पास करून येतात. त्यांची नैतिक गुणवत्ता तपासली जात नाही, या महत्त्वाच्या मुद्याकडे माजी सनदी अधिकारी अरूण भाटिया यांनी लक्ष वेधले आहे. पुजा खेडकर प्रकरणाने ही बाब ठळकपणे समोर आली आहे.

वीस टक्के सनदी अधिकारी प्रामाणिक..

पुजा खेडकर प्रकरण समोर आले याचा आनंद आहे, असे मत भाटिया यांनी नोंदविले आहे. सनदी सेवा किती भ्रष्ट आहे हे या प्रकरणावरून जनतेला कळले. अवघे वीस टक्के सनदी अधिकारी प्रामाणिक आहेत असे ते म्हणतात. सध्या सर्व राजकीय यंत्रणा भ्रष्ट झाली आहे. सेवेतील सनदी अधिकारी भ्रष्ट आहेत. राजकारण्यांचा वरदहस्त त्यांच्यावर असल्याचे दिसते. या परिस्थितीत बदल होण्याची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी नोंदविले. पूजा खेडकर प्रकरणात सध्या चौकशीचे नाटक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुणे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

चांगल्या तरूणांना संधी मिळावी

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या तरूण मुलांना हेरून त्यांना सनदी सेवेत आणले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. वेगवेगळ्या संस्थात्मक बाबी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

Tribal Department : वादग्रस्त पूजा खेडकर आता अकोल्यात!

राज्यकर्ते जनहिताचे निर्णय घेतात. सर्वसामान्यांच्या समस्या लवकर मार्गी लागाव्यात , लवकर न्याय मिळावा हीच सरकरची भूमिका असते. ही सर्व कामे नोकरशहांच्या हातात असतात, ते वेगवेगळी कारणे सांगून सतत अडथळे आणतात. सामान्यांशी अधिकारी वर्गाचे वागणे उर्मटपणाचे असते. स्वतः चा स्वार्थ पूर्ण झाल्याशिवाय प्रकरण पुढे सरकत नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरपर्यंत जावे लागते.

कर्तव्याची जाणीव हवी

एकंदरीत काय तर अधिकारी कर्तव्य भावनेने, नैतिकता जोपासून कार्य करीत नाही. याबाबत त्यांना शिस्त लावणे आवश्यक आहे. अधिकारी म्हणून आपला तोरा दाखवण्यापेक्षा आपण जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठीच आपली नेमणूक झाली आहे, या कर्तव्याची जाणीव ठेवणे तेवढेच गरजेचे आहे.

पूजा खेडकर प्रकरणाने अनेक बाबी समोर आल्या.

मुलीच्या चुकीच्या वागणुकीला आळा घालण्याऐवजी आई-वडील तिच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करताना दिसतात. पैशाच्या जोरावर काहीही करता येते हाच आविर्भाव त्यातून दिसून येतो. नैतिक गुणवत्ता तपासली न गेल्यास कोणते परिणाम होऊ शकतात याची चुणूक या प्रकरणावरून लागते.

निःपक्ष चौकशी होणे गरजेचे

आता पूजा खेडकर आणि कुटुंबीय चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. अतीशहाणपणा आणि लबाडी किती घातक ठरू शकते याचा अनुभव या कुटुंबाला येणार आहे.

IAS Puja Khedkar : दिव्यांग प्रमाणपत्र दिले नगरच्या रुग्णालयाने 

एवढेच नव्हे तर पूजाला या पदापर्यंत सुखरूप नेऊन पोहचवण्यात हातभार लावणाऱ्या सर्व यंत्रणांचा ढिसाळ कारभार व तेथील मुरलेला भ्रष्टाचार समोर येणार आहे. फक्त निःपक्षपणे व कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी झाली पाहिजे. शासन आणि प्रशासनाचा स्वास्थ्यासाठी ते आवश्यक आहे.

error: Content is protected !!