Nashik : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दोन रस्त्यांच्या चौपदरीकरणाची मागणी केली आहे. यासंदर्भात भूजबळ यांनी गडकरींना एक निवेदन दिले आहे. यामध्ये येवला बायपाससह मनमाड-येवला कोपरगाव रस्त्याच्या चौपदरी करणास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चौपदरीकरणाची कामे भारतमाला परियोजने अंतर्गत व्हावीत, अशीही मागणी भूजबळांनी केली आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी हा इकॉनॉमिक कॉरिडॉर, राष्ट्रीय महामार्ग ५२, ६१ आणि १६० ला जोडतो. हा सर्वात जवळचा उत्तर दक्षिण महामार्ग आहे. तसेच ७५२ जी हा उत्तर भारतापासून शिर्डीला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. नॅशनल हायवे ७५२ एच च्या शिवूर ते येवला या टप्प्याच्या उन्नतीकरणासाठी केंद्राने १८१.०८ कोटी मंजूर केले. हा मार्ग येवला शहरातील नॅशनल हायवे ७५२ जी ला फत्तेबुरुज नाका जंक्शन येथे मिळतो. त्यामुळे येवला शहरात प्रचंड गर्दी होऊन वाहतूक मंदावली असून यामध्ये तातडीने हस्तक्षेपाची गरज आहे, असे भूजबळ म्हणतात.
कांद्याचे होताहेत वांद्ये
येवला शहरातून जाताना अरुंद रस्ते लागतात. त्यामुळे शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीसह प्रमुख बाजारपेठ आहे. महामार्गालगत राज्य परिवहन बस डेपो देखील आहे. देशातील एकूण 2359 किसान रेल्वे पैकी 1838 म्हणजे सुमारे 78 टक्के एकट्या महाराष्ट्रातून जातात.
MLC Election : काँग्रेसला दगा देणाऱ्यांची नावे पोहोचली दिल्लीत
जानेवारी 2021 ते मे 2022 पर्यंत नगरसुल मधून 440 तर येवला व लासलगावमधून प्रत्येकी 100 रेल्वे मालवाहतूक करण्यात आली. यामध्ये कांदा, द्राक्षे, टोमॅटो,खरबूज या पिकांची चितपूर, फतुहा, आगरतळा, नौगाचिया, छपरा, बैहाता, धुपगुरी, संकरेल, डंकुनी, गौरमालदा, गुवाहाटी, न्यूजलपाईगुडी, दिल्ली येथे वाहतूक करण्यात आली. सर्व किसान रेलमधील कांदा व इतर शेतमाल येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमधून जातो. या मालाची वाहतूक नॅशनल हायवे 752 जी ओलांडून रेल्वे स्टेशनवर केली जाते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.
वाहतूक कोंडी थांबेल
संबंधित चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी करण्याच्या धोरणाला मदत होईल. तसेच उत्तर दक्षिण कंटेनर वाहतूक देखील सुरळीत होईल. उत्तरेकडून दक्षिणेत जाणारे जड कंटेनर येवला बायपासच्या बाभूळगाव, आंगणगाव, पारेगाव मार्गे वळतील. तसेच प्रवासी आणि स्थानिक मालवाहतूकीसाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध होईल. त्यामुळे येवला शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असेही भूजबळ पत्रात म्हणतात.