महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : आम्ही सत्तेत यायचे की नाही, हे ठरवणारे तुम्ही कोण?

Nana Patole : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेवरून विधानसभेत खडाजंगी.

 Political War : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी (ता. 12) विधानसभेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्याला हात घातला. योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांसह इतर कागदपत्रे मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे ते म्हणाले. त्यावरुन सत्ताधारी पक्षाचे आमदार राम कदम भडकले. त्यानंतर पटोलेंच्या आरोपांवर मुनगंटीवारांनी जोरदार हल्ला चढवला. मात्र त्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच हमरीतुमरी झाली. 

नाना पटोले म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे कागदपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागाचे एक अॅप आहे. त्यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना या सर्व कामांची गर्दी झाली आहे. शाळा महाविद्यालयांचे प्रवेश आहेत. एकाच अॅपवर लोड येत आहे. तहसील कार्यालयांत लोकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन सिस्टीम बंद करून काही काळ ऑफलाईन कार्यवाही करावी.

सभागृहाचे वातावरण तापले

नाना पटोले बोलत असताना आमदार राम कदम उभे झाले आणि भडकले. ‘नाना पटोले तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले. वस्तुस्थिती अशी आहे की, एका घरात तीन बहिणी असतील. तर त्या तिघींनाही पैसे मिळणार आहेत. पण काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट तिघेही चुकीचे फॉर्म भरत आहेत. ही योजना फसावी, असे तुमचे प्रयत्न आहेत,’ असे आरोप त्यांनी केले. त्यानंतर सभागृहातील वातावरण तापले.

राजकारण का?

या गोंधळामुळे मग वनमंत्री सुधीर मुनगंटीवारही भडकले. ते म्हणाले, ‘नाना भाऊ, तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पण आता तुम्ही यामध्ये राजकारण आणत आहात. आम्ही सत्तेत यायचे की नाही, हा तुमचा अधिकार नाही. राज्यातील बहिणींचा आहे.शिवभक्तांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरही तुम्ही राजकारण कशाला करता? तुम्ही इथे महागाईवर बोलता आणि जिथे तुमची सत्ता आहे 

Maharashtra Council : ‘फाईव्ह स्टार’मध्ये रात्रभर पार्ट्या चालतात; त्याचे काय?

कर्नाटकने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवले. अन् तुम्हीच आता सांगता की खोटे सांगितले. तुमच्या नेत्यांचे व्हिडिओ फिरत आहेत सोशल मिडियावर,’ या शब्दांत मुनगंटीवारांनी विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!