महाराष्ट्र

Shivaji Maharaj : महाराष्ट्रात वाघनखं कधी, कुठे बघायला मिळणार?

Sudhir Mungantiwar : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली विधानसभेत माहिती.

Wagh Nakh Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केल्याच्या आरोपांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. वाघनखे भारतात आणण्यासाठी एकही अतिरिक्त रुपया खर्च करण्यात आला नाही. असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 19 जुलैला सातारा येथे सरकारी संग्रहालयात दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि काही सरदारांची उपस्थिती असेल. यासोबतच शस्त्रास्त्र दालनाचेही उद्घाटन होणार आहे,अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वाघनखांच्या संदर्भात निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत शंकांचेही निरसन त्यांनी केले.

विशेषतः वाघनखे भारतात आणण्यासाठी ब्रिटनमधील संग्रहालयाला भाडे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देत मुनगंटीवार यांनी एकही रुपयाचे भाडे देण्यात आलेले नाही आणि दिलेही जाणार नाही, असे स्पष्ट केले. फक्त वाघनखांच्या प्रवासासाठीच 14 लक्ष 8 हजार रुपयांचा खर्च केला गेला आहे, असे ते म्हणाले. वाघनखे दर्शनासाठी ठेवण्याकरिता 7 कोटी रुपये सरकारकडून खर्च होत असल्याचा दावा काहींनी केला होता

विरोधकांचे आभार 

हा दावा पूर्ण असत्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन आणि त्यांची डागडुजी यासाठी खर्च करण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ब्रिटनहून वाघनखे आणण्याचा निर्णय झाला तेव्हापासून आतापर्यंत किरकोळ अपवाद वगळता विरोधी बाकावरील 99 टक्के लोकांनी आनंदाने स्वागत केले, याबद्दल मुनगंटीवार यांनी विरोधकांचे आभारही मानले.वाघनखे महाराजांची आहेत की नाही

Voting Percentage : गडकरींचं मताधिक्य का घटलं ? भाजपकडून नागपुरात मोठी कारवाई !

शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष आहे की नाही, यासंदर्भात शंका निर्माण करणाऱ्यांनाही मुनगंटीवार यांनी रोखठोक उत्तर दिले. ही वाघनखे महाराजांचीच आहेत आणि अभ्यासकांकडून शहानिशा केल्यानंतरच 350वे वर्ष साजरे करण्याचा निर्णय झाला, असे मुनगंटीवार म्हणाले.

वाघनखांचा तीन वर्षे मुक्काम..

ब्रिटन येथील संग्रहालयात असलेली वाघनखे भारतात आणण्यासाठी करार झाला तेव्हा तेथील सरकारने फक्त एक वर्षासाठी देऊ, असे म्हटले होते. मात्र एवढ्या कमी कालावधीत संपूर्ण देशातील शिवभक्तांना दर्शन घेणे अशक्य आहे, त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आले. आता वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात ठेवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!