Pune Porsche Cars Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात लहान अधिकाऱ्यांवर कारवाई केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आले. हा मुद्दा गुरुवारी (ता. 11) विधानसभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
अंबादास दानवे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, त्या घटनेमध्ये पुण्याचे नाव बदनाम होऊ नये. हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे योग्य आहे. पण अमितेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही केली होती. त्यावर काहीही केले नाही. छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. मोठ्यांना सोडले जाते. अमितेश कुमार यांचे नाव मोठे आहे. पण त्यांच्यासडून गलथानपणा झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
रक्ताचे नमुने बदलण्यात आले
रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार झालेला आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग, गृह विभाग याला जबाबदार आहे. अरुण भाटीयांचं नाव मोठं आहे. त्यांनीही विभागाला पत्र लिहिलं. पण त्यानंतरही केवळ एका पोलिस निरीक्षकावर कारवाईच्या व्यतिरिक्त काहीही झाले नाही. त्यावर फडणवीसांनी पोलिस आयुक्तांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली. काही लोकांना सवय आहे. एखादा अधिकारी डोईजड होत असेल. तर विनाकारण त्याचा विरोध करणे. पण विरोधी पक्षनेत्यांनी असे करू नये, असे म्हणत फडणवीसांनी दानवेंना टोला लगावला.
रात्री अडीच वाजताची ती घटना आहे. पोर्शे कार चालवणारा जो व्यक्ती आहे. त्याने अपघात केला. त्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 08.13 वाजता एफआयर नोंदवला गेला. मिडियाच्या ट्रायलनंतर गुन्हा नोंदवला गेला, असेही काही नाही. आदी 304 अ मध्ये नोंदवला होता. १०.३० वाजता वरीष्ठ अधिकारी आले. त्यांनी सांगितले 304 दाखल केला पाहिजे. तो लावण्यात आला. त्याच दिवशी 12 वाजताच्या सुमारास जुडीनाईल जस्टीसमध्ये हे प्रकरण पाठवण्यात आले.
न्यायालयासमोर प्रकरण आले, तेव्हा पोलिसांनी मागणी केली की, त्या मुलाला मायनर म्हणून नव्हे तर मेजर म्हणून ट्रीट करा. पण दुर्दैवाने ज्युडीनाईल जस्टीसनी पोलिसांची ही मागणी मान्य केली नाही. विधीसंघर्षग्रस्त बालकाचा गुन्ह्यात सहभाग होता. त्याची जन्मतारीख 14.09.2006 आहे. त्याचे वय 17 वर्ष 8 महिने आहे. त्यामुळे निर्भया प्रकरणाच्या वेळी झालेल्या नवीन नियमानुसार त्याला अपराधी ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करण्यात आली.
निर्भयाची आठवण
निर्भयाचे प्रकरण झाले होते. त्यानंतर काही महिने कमी असलेले अपराधी असतात, त्यांना अपराधी म्हणून घेता येईल, असा निर्णय झाला होता. पोलिस थांबले नाही. त्याच दिवशी वरच्या न्यायालयात अपील केली. नव्याने ऑर्डर करण्याची विनंती केली. त्यांनी पुन्हा ज्युडीनाईल न्यायालयात जाण्यास सांगितले.
Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’
पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी प्रोअॅक्टीव कारवाई केली आहे. या प्रकरणात कारवाई पोलिस निरीक्षकावर करण्यात आली. कारण आरोपीला आणल्याबरोबर पोलिस निरीक्षकाने मेडिकल करायला पाहिजे होते. पण त्यांनी गुन्हा दाखल केल्यावर ते केले. त्यामुळे निरीक्षकावर कारवाई करण्यात आली, असे फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले आणि आयुक्तांवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली.