महाराष्ट्र

Voting Percentage : गडकरींचं मताधिक्य का घटलं ? भाजपकडून नागपुरात मोठी कारवाई !

Nitin Gadkari : नागपूर पश्मिम विधानसभा बुथप्रमुख बडतर्फ, नगरसेवकांकडूनही लेखाजोखा मागणार. 

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात भाजपचं मिशन 45 सपशेल फेल ठरलं आणि मोठ्या कसरतीनंतर महायुतीला फक्त 17 जागा मिळवता आल्या. यामध्ये भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव झाला, तर काही नेत्यांचे मताधिक्य घटल्याचे दिसून आले. या विषयाला गांभीर्याने घेत भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. 

आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे.  पक्ष ‘ॲक्शन मोड’वर आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री तथा हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या मताधिक्यात मोठा फरक पडलाच याला जबाबदार असल्यानं भाजपकडून बुथप्रमुखाला घरचा रस्ता दाखविल्या गेला आहे. नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. मतमोजणीच्या 20 फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे यांना मिळालेल्या 5,17,424 मतांविरुद्ध गडकरींना 6,55,027 मते मिळाली. 

बसपाचे उमेदवार योगेश लांजेवार 19,242 मतांसह तिसरे राहिले, तर 5,474 मते नोटाला गेली. या निवडणुकीत गडकरींच्या विजयाचे अंतर 78,397 इतके कमी झाले. 2019मध्ये त्यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांचा २,१६,००० मतांनी पराभव केला होता. वर्षभर निवडणूक मोडमध्ये असलेल्या भाजपची तयारी आणि निवडणुकीचा निकाल यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. भाजपच्यावतीने लोकसभेसाठी पन्ना प्रमुख, घर चलो अभियान, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, संपर्क अभियान असे कार्यक्रम राबवण्यात आले होते. 

येवढी मेहनत करूनही यश मिळालं नसल्यामुळे आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपने कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये नागपूरच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बुथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि कार्यकारणी यांना बडतर्फ करण्यात आले आहेत. येत्या काळात सक्रीय कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 25 जुलैपर्यंत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपकडून तयारील सुरुवात झाली आहे.

मताधिक्य फक्त दीड लाखांचेच..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा पाच लाखांचे मताधिक्यांनी निवडूण येणार असल्याचा दावा पक्षाकडून केला गेला होता. मात्र प्रत्यक्षात दीड लाखांचेच  मताधिक्य त्यांना घेता आले.

Mumbai News : महत्वाची बातमी; पुन्हा नामांतर !

लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे 3 लाख आणि 2 लाख 17 हजार मताधिक्य गडकरींना होते.

नगरसेवकांनाही द्यावा लागणार लेखाजोखा..

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत  शहरातून 108 नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय चार आमदार भाजपचे आहेत. नागपूरमधील काही भाग वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांना मताधिक्य आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात मोठी घट झाली आहे. यामुळे महापालिकेतील या 108 नगरसेवकांचा लेखाजोखा पक्षाकडून लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!