प्रशासन

Akola : शासकीय कार्यालयात चाललंय काय? 

FIR : अभियंत्यांकडूनच महिलेवर अत्याचार !

Akola : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाहेरच्या गुन्हेगारांवर वचक ठेवताना सरकारच्या नाकी नऊ येत असताना आता सरकारच्याच एका कार्यालयात अशी घटना घडल्याने आश्चर्य आणि चीड व्यक्त होत आहे.

आरोपींमध्ये शाखा अभियंता आर. इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पिडीतेला पगार काढणे आणि पगारात वाढ करण्यासाठी या दोघांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. शासकीय कार्यालयातच अशा घटना घडत असल्यानं महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अकोला जिल्हा परिषद शाळेत एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना असेल किंवा जिल्हा परिषद मधील एका ग्रामसेवक महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण असेल, या घटना ताज्या असताना पुन्हा वाईट गोष्टीसाठी अकोला जिल्ह्याचे नाव चर्चेत आले आहे. 

हे तर अतीच झाले

जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयातील या दोन अधिकाऱ्यांनी 29 वर्षीय तरुणीकडे शरीर सुखाची मागणी तर केलीच. शिवाय येथेच न थांबता तिच्यावर बळजबरी करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप पीडीत तरुणीने केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नेमकं काय घडलं?

मूर्तिजापूर शहरातल्या जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयात 29 वर्षीय तरुणी कंत्राटी कंम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. काही महिन्यांपासून तिचा पगार थकीत आहे, त्यात पगारात वाढ व्हावी, म्हणून पीडित तरुणीनं कार्यलयातील शाखा अभीयंता डी.बी. कपिले यांच्याकडे पगारवाढ मिळावी म्हणून विनंती केली. मात्र पहिले त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर दुय्यम अधिकारी आर. इंगळे यांना भेटली असता, ‘मी SDO नाही, त्यामुळे काही करू शकणार नाही’, असं म्हणत पगार काढण्यासाठी शरीर सुखाची मागणी तरुणीकडं केली. 

चेंबरमध्ये बोलावले आणि..

तसेच 20 जून रोजी कपिले याने तरुणीला चेंबरमध्ये बोलवले आणि संधी साधत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता कामावरून काढण्याची धमकी अधिकारी देऊ लागला. अखेर तरुणीनं घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला.

Gondia News : कर्मचाऱ्याने उपसरपंचांना कक्षात जाण्यापासून रोखले !

कुटुंबियांनी मूर्तिजापूर पोलिस स्टेशन गाठलं. तरुणीच्या तक्रारीवरून शाखा अभीयंता डी.बी. कपिले आणि आर. इंगळे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सद्यस्थितीत याप्रकरणी पीएसआय अरुण मेश्राम अधिक तपास करत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!