Vanchit Bahujan Aghadi : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक (Lok Sabha) होत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली होती. निवडणुकीच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा, यासाठी बरेच प्रयत्न केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसमोर आंबेडकर यांची बाजू मांडली. परंतु निवडणूक आटोपल्यानंतर आता आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत असलेल्या युतीचा खात्मा झाल्याचे जाहीर केले आहे.
उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना तथा वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली होती. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती झाली होती. मात्र आता ही युती तुटलेली आहे. आता काहीही राहिले नाही. त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊ. त्यानंतर सगळ्या प्रश्नावरती उत्तर देऊ. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गटात चर्चा सुरू झाली आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो..’ असा हा प्रकार असल्याचे शिवसेनेकडून आता बोलले जात आहे.
भविष्य कोणाला ठाऊक?
निवडणुकीत भवितव्य कोणीही सांगू शकत नाही. लोकांच्या मनात असेल तर लोक मतदान करतील. 31 खासदार निवडून आले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत. त्यांना सगळ्यांनीच झुलवत ठेवले आहे. केला.मनोज जरांगे पाटलांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. हे करायचे असेल तर त्यांनी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीसाठीच्या (ST) जागा सोडून इतर जागांवर गरीब मराठा उमेदवार द्यावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा वाद वेगळा ठेवून आरक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. यासंदर्भात सर्वांना बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) 288 जागांवर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन भारी पडेल, असे ते म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केले. जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, तरी यांनी विधानसभेच्या सर्व जागा लढव्यावात. मात्र 288 जागांवर त्यांनी गरीब मराठा उमेदवार द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
दीड हजार काय करणार?
अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. महिलांसाठी लाभदायक अशी योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या योजनेवर टीका केली आहे. लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजनासुद्धा आणा अशी मागणी होत आहे. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, लाडकी बहिण योजनेसंदर्भात काही कविता आल्या आहेत. त्या फार चांगल्या आहेत. तुम्ही दीड हजार रुपये महिना दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पण या दीड हजारात गॅस सिलिंडर स्वस्त मिळाले का? दीड हजारात पौष्टिक आहार मिळेल का? अशा योजना फसव्या असतात.