महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांचे हाल होऊ देणार नाही

Karnataka Power Corporation : मुनगंटीवार यांच्या हस्ते 2.73 कोटी रुपयांच्या धनादेशांचे वितरण

Chandrapur News : विकासाचे अनेक प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात होत आहेत. यासाठी लोकांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे हाल होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न 15 वर्षांपाासून रखडला होता. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. 

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना आता मदत मिळाली आहे. 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले आहे. पॅकेजअंतर्गत 23 लाभार्थ्यांना 2 कोटी 73 लाखांचे धनादेश वाटप मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार (भूसंपादन), अतुल जटाळे (पुनर्वसन), डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर, बरांज मोकासाच्या सरपंच मनिषा ठेंगणे, प्रवीण ठेंगणे आदी यावेळी उपस्थित होते.

सतत केला पाठपुरावा

सुधीर मुनगंटीवार यांना बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांच्या पुनर्वसनाचा विषय कळल्यानंतर त्यांनी सातत्योन केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोळखा खाण 2015 ते 2021 दरम्यान बंद होती. खाण सुरू झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कुटुंबांना बंद काळातील पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय कोळखा मंत्री रेड्डी यांची दिल्लीत भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या समस्येचे गांभीर्य त्यांनी रेड्डी यांना पटवून दिले.

Sudhir Mungantiwar : एकही लाडकी बहिण योजनेतून सुटणार नाही

मुनगंटीवार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारला प्रकल्पग्रस्तांची दखल घ्यावीच लागली. त्यानंतर बरांज मोकासा, तांडा आणि चेकबरांज, पिपरबोडी येथील 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यात आले.

आपण कायम प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्री किशन रेड्डी यांना चंद्रपुरात आणून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. पुनवर्सन पॅकेजअंतर्गत ज्या प्रकल्पग्रस्तांना धनादेश मिळाले, त्यांनी ही रक्कम सुरक्षित ठेवावी. उर्वरीत प्रकल्पग्रस्तांनाही धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. कोणीही पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे बरांज मोकासा येथील श्यामराव बालपाणे, दौलत बालपाणे, सुधाकर बालपाणे, दादाजी निखाडे, ताराबाई पालकर, बबन सालुरकर, एकनाथ तुळनकर, अशोक पुनवटकर, मायाबाई देवगडे, सुशीला डहाके, शंकर काथवटे यांना लाभ मिळाला आहे. चेकबरांज येथील सुर्यभान ढोंगे, सुमन ढोंगे, संजय ढोंगे, लक्ष्मण कोवे, नीळकंठ मेश्राम यांनाही मदत मिळाली आहे. नोकरीच्या ऐवजी एकरकमी मोबदला म्हणून देवराव परचाके, भाऊराव परचाके, विश्वनाथ जिवतोडे, काशिनाथ जिवतोडे, शशिकला चालमुरे, परसराम घाटे, हनुमान भोयर या सर्वांना एकूण 2 कोटी 73 लाख रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून स्वाती हर्षल पारखी आणि लता बाळू गेडाम यांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश वाटप मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!