Political Change : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 5 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वंचित’ने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नाही. प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंदोलन झाले. त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना बोलून त्यांना पोलिस आयुक्तांना बोलायला लावले. कोणालाही अटक होणार नाही याची दक्षता आयुक्तांना घेण्यास संगितले आहे. शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
घरे पाडणार नाही
अतिक्रमणातील घरे पाडली जाणार नाहीत. त्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही सांगण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. गायरान व शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटीसना स्थगिती देण्याची मागणीही वंचितकडून करण्यात आली होती. नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करण्यात आला. दीक्षाभूमीवरील (Nagpur Deekshabhoomi) पार्किंगला विरोध करत बांधकामासाठी आणलेले साहित्य तोडफोड करून जाळण्यात आले.
आंदोलन तीव्र झाल्यावर लाठीचार्ज करण्यात आला. भंतेजी यांच्यावर कारवाई करण्यात आली, हे योग्य झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पाहणीसाठी समिती पाठवावी, अशी मागणी विरोध पक्ष नेत्याकडून होऊ लागली. नागपूर दीक्षाभूमीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगला जनतेचा विरोध आहे. अंडरग्राउंड पार्किंगसाठी खोदकामामुळे बौद्ध स्तुपाला धोका होऊ शकतो. 1 जुलै रोजी लाठीचार्ज झाला. याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सुद्धा मागणी करण्यात आली होती.
काँग्रेसही आक्रमक
नागपूर येथील दीक्षाभूमी प्रकरणी काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलनानंतर या कामाला समिती देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने केली होती.
या संदर्भात सर्वांची चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यात येईल. त्यानंतरच दीक्षाभूमी येथे कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.