महाराष्ट्र

Maharashtra Assembly : मोठ्या भावाच्या जागांवर लहान भावाचा घाव

Maharashtra Government : महायुतीत ठिणगी पडल्याचे संकेत

Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक झाल्याझाल्या आता महायुतीने आपले लक्ष विधानसभेवर केंद्रित केले आहे. असे करीत असताना सर्वेक्षणाच्या आधारावर महायुतीतील घटक पक्षात जागावाटप केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीच्या मोठा भाऊ असलेला भाजप त्यांच्या हक्काच्या जागांवर महायुतीतील लहान भाऊ भावाकडून घाव करण्यात येत असल्याचे बोलत आहे. या घडामोडीत महायुती ठिणगी तर पडणार नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात एकनाथ शिंदेंना त्यांच्या हक्काच्या जागा मिळवताना संघर्ष करावा लागला. 2019 मध्ये शिवसेनेने (Shiv Sena) जिंकलेल्या जागांवर भाजपने दावा सांगत शिंदेंना अडचणीत आणले. अखेर शिंदेंना मोठे प्रयत्न करीत 15 जागा मिळविता आल्या. भाजपचे (BJP) सर्वेक्षण याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात वापरलेली व्यूहनीती शिंदेसेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वापरण्यास सुरुवात केली आहे.

अनेक जागांवर दावा

नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिंदेसेना दावा करणार आहे. तसा निर्धार शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी व्यक्त केला. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष जागा वाटपात करेल, असे चौगुले म्हणाले. शिंदेसेनेनं बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघांवर दावा सांगितल्यानं महायुती खटके उडण्याची चिन्हं आहेत.

हे आहे कारण

ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत. गणेश नाईक ऐरोलीचे तर मंदा म्हात्रे बेलापूरचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. म्हात्रे 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या. नाईक 2019 मध्ये भाजपकडून निवडून आलेत. विशेष म्हणजे म्हात्रे आणि नाईक एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. या जागेवर आता शिंदेसेनेने घुसखोरी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे जागावाटप सुरू असताना शिंदेंचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपने दावा केला होता. त्यामुळे शिंदे अडकित्त्यात सापडले होते. त्यांना हक्काच्या जागा पदरात पाडून घेताना बरीच कसरत करावी लागली होती.

लोकसभेत शिंदेसेनेची कामगिरी भाजपपेक्षा चांगली राहिली. राज्यात सर्वाधिक 28 जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. शिंदेसेनेने 15 जागा लढवत 7 जागा निवडून आणल्या. शिंदेंचा ‘स्ट्राइक रे’ट भाजपपेक्षा वरचढ राहिला. शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी लोकसभेच्या जागा वाटपावेळी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत भाजपला लक्ष्य केले होते.

‘भाजपनं स्वत:च्या जागा एका फटक्यात जाहीर केल्या. त्याच पद्धतीने शिंदेसेनेला एकाच वेळी सगळे उमेदवार जाहीर करू दिले असते, तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या. आमच्या जागांवर दावे केले गेले. त्यामुळे जागावाटपास विलंब झाला.

Maharashtra Assembly : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

सर्वेक्षणामुळे उमेदवार बदलले गेले. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. याचे कारण म्हणजे जागाच उशिरा सुटल्या’, अशा शब्दांत त्यांनी भाजपला रडारवर घेतले होते. ही सर्व राजकीय घडामोडी बघता लहान भावांने मोठ्या भावाच्या ‘प्रॉपर्टी’त केलेली हिश्श्याची मागणी महायुतीत ‘दरार’ टाकेल का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!