Congress : भारतीय क्रिकेट संघाने टि-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. या संघासाठी खास बस मागविण्यात आली आहे. निळ्या रंगाची ही बस गुजरातमधून मागविण्यात आली आहे. आता या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपसह महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यासंदर्भात विधानभवनात प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीय संघासाठी मुंबईत खास बस मागविण्यात आली आहे. ही बस गुजरात मधून मागविण्यात आली आहे. महाराष्ट्रात बसचा दुष्काळ होता का, असा सवाल त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. क्रिकेट संघासाठी देशभरात कुठेही बस मिळाली नाही का, असेही ते म्हणाले. गुजरातमधून खास बस मागविणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमानच असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक गोष्टीसाठी गुजरातवर अवलंबून का राहायचे असेही पटोले म्हणाले.
गुजरातप्रेम सोडा
सुरुवातीपासूनच महायुतीला गुजरातबद्दल प्रेम राहिले आहे. उद्योग गुजरातमध्ये नेले. छोट्यात छोटी बाब असली तरी गुजरातमधील दिल्लीतील नेत्यांना विचारायचे असा प्रकार सुरू आहे. आता बसही गुजरामधून बोलावण्यात आली आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचे पटोले म्हणाले. महायुतीला महाराष्ट्राचे नव्हे तर गुजरातचे हित साधायचे आहे. सरकारने मुंबई विकायला काढली आहे. याचा पर्दाफाश काँग्रेसने विधिमंडळात केला आहे, असेही पटोले म्हणाले.
मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवला. त्यानंतरही यांचे गुजरातप्रेम कमी होत नसल्याची टीका पटोले यांनी केली. महाराष्ट्राचा कशाप्रकारे अपमान केला जात आहे, हे सगळेच पाहात आहेत.
Assembly Session : मुंबई वाचविण्यासाठी वडेट्टीवारांचे रौद्ररूप
आगामी विधानसभा निवडणुकीतही मतदार भाजपला चांगलाच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले म्हणाले. महायुती सरकारीने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे.
काँग्रेस आक्रमक
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळाले आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. काँग्रेससोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटही वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेषत: मुंबईचे अनेक मुद्दे सध्या महाविकास आघाडीकडून उकरून काढले जात आहेत.