महाराष्ट्र

Devendra Fadanvis : मागील सरकारच्या काळात काय काय फुटलं ?

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांचा हल्ल्यावर फडणवीसांचा प्रतिहल्ला.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : महाराष्ट्र राज्य सरकारी नोकर भरतीतील पेपरफुटीचा मुद्दा सोमवारी सभागृहात चांगलाच गाजला. परीक्षांमध्ये गोंधळ होतो आहे. घोटाळे करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. तलाठी भरतीचे पुढे काय झाले, तेही माहिती नाही. यामध्ये कुणी उच्चपदस्थ असला तरीही त्याला दोषी धरले पाहिजे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्ला चढवला. त्यावर मागील सरकारच्या काळात काय काय फुटलं, हे सांगू का, असा प्रश्न करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हल्ला परतवून लावला.

बाळासाहेब थोरात प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. त्यावर फडणवीस म्हणाले, हा विषय फारच गंभीर आहे. मागीच्या सरकारच्या काळात काय काय फुटलं, त्याची जंत्री आणली आहे. पण मला या विषयात राजकारणात जायचे नाही. एका विद्यार्थ्याच्या अॅडमीट कार्डवर एबीसीटी पॅटर्न लिहीले होते. त्यातील घोळ लक्षात आल्यावर आपण परीक्षा रद्द केली आणि कारवाई केली. एक रिपोर्ट आला. त्यामध्ये 100 पैकी 48 प्रश्नांत एक विद्यार्थी पास आहे.

पॅटर्नमधील काही उत्तरं चुकली होती. टिसीएसच्या बाबतीत सांगायचं झालं तर टीसीएस स्वतःच्या केंद्रांवरच परीक्षा घेते. पण यावेळी संख्या जास्त असल्यामुळे काही केंद्र अॅक्वायर केले आणि परीक्षा घेतल्या. त्यामुळे कदाचित गोंधळ उडाला. मात्र आता पुढील परीक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रांवरच होणार आहेत. तलाठी भरतीच्या परीक्षेत उत्तर चुकलं होतं. म्हणून ती परीक्षा रद्द केली. उत्तर चुकलं तर सर्वांना समान गुण दिले जातात. पण दरम्यान सर्वांची ओरड झाली. त्यामुळे तो पेपरच रद्द केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या परीक्षेच्या व्यतिरिक्त आपण इतक्या भरती केल्या. पण यावेळी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला. पण काही लोक जेव्हा चुकीचे स्टेटमेंट करतात, तेव्हा युवांमध्ये अविश्वास निर्माण होतो. हे टाळले पाहिजे. सरकारला आता 57,452 लोकांना नियुक्तीपत्र द्यायचे आहे. 19,853 घोषीत केले आहेत आणि कुठल्याही घोटाळ्यावीणा 77.500 लोकांना सरकारने नोकरी दिली आहे. अजून 31,210 लोकांच्या परीक्षेची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!