Gadchiroli District : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शनिवारी (ता. 29) सभागृहात आक्रमक झाले.
वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती तर मुलाचा जीव वाचला असता. या घटनेची माहिती घेतली असता. गडचिरोलीत आरोग्य विभागाची 70 टक्के पदे रिक्त आहेत, अशी माहिती मिळाली. ही पदे रिक्त असल्याने डॉक्टर उपस्थित राहत नाही. रूग्णांना योग्य ती सेवा मिळत नाहीत. रूग्णवाहिकेच्या वाहन चालकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे असे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य विभागाची पदे तात्काळ भरली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकार जबाबदारी घेणार की नाही?
नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही, असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी नीट परीक्षेवरून सरकारला विभानसभेत धारेवर धरले.
६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. राज्यात मोर्चे निघत आहेत. नांदेड मध्ये 15 हजार विद्यार्थी रस्त्यावर आले होते. त्यामुळे सरकारने या परीक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी.
Maharashtra Assembly : महाराष्ट्र भक्तीधाम राजधानीत व्हावे साकार
उद्या बोगस डॉकटर झाले तर लोकांच्या आरोग्याशी तो खेळ होईल. राज्यात काही लोकांना अटक झाली आहे, याचीदेखील माहिती सरकारने द्यावी, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.