Political War : शिवसेना शिंदे गटासोबत गेलेले आमदार ठाकरेंसोबत येतील, अशी चर्चा नेहमीच होत असते. त्यातच, शिवसेना शिंदे गटात गेलेल्या एका माजी आमदाराने आज उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा एका वृत्त वाहिनीने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र दावा साफ खोटा असल्याची प्रतिक्रिया स्वतः या माजी आमदाराने ‘द लोकहित’शी बोलताना दिली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
राज्याच्या राजकारणात अनेक बदलाचे वारे पाहायला मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात फूट पडली आहे. या राजकीय बदलाचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला. लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीपूर्वी राजकीय चर्चांना मोठं उधाण आले आहे. दावे प्रतिदावे विविध पक्षाकडून करण्यात येत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची बातमी एका स्थानिक वृत्त वाहिनीवर दाखविण्यात आली.
Akola News : पाण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा पेटली ठाकरे गटाची ‘मशाल’
परंतू आपल्या भेटीचा विपर्यास करण्यात आला असून परत जाण्याचा प्रश्न अजिबात येत नाही, अशी प्रतिक्रिया स्वतः माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी ‘लोकहीत’शी बोलताना दिली आहे.
असं काही घडलंच नाही
पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्ट जवळ झालेल्या भेटीमुळे. त्यानंतर, आता दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरेसोबत झालेल्या भेटीची चर्चा रगंली आहे. वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार गोपीकिशन बजोरिया आणि विप्लव बजोरिया या पिता पुत्रांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दुपारी पोहोचले होते. ठाकरेंच्या शिवसेना पक्षात पुन्हा घेण्याबाबत या दोघांकडून विनंती करण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट शब्दात नकार देण्यात आल्याचे समजते. तर यासंदर्भात द लोकहीत ने माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तर बाजोरिया यांनी यावर बोलताना असं काही घडलंच नाही असं म्हटलं आहे.
परत जाण्याचा प्रश्नच नाही!
शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी शिवसेना ठाकरे गटात जाणार नसल्याचं म्हटलं आहे. विधान भवन परिसरात अनेकांची भेट होत असते. परत शिवसेना ठाकरे गटात जायचा प्रश्नच नाही. त्यामुळे गोपिकीशन बाजोरिया हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार बाजोरिया यांनी ‘द लोकहीत’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.