महाराष्ट्र

Maharashtra Budget : नाराजी दूर!! शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

Assembly Session : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची मोठी घोषणा

Mahayuti Announcement : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर अखेर महायुती सरकारने अर्थसंकल्पातून हुकमाचे दोन एक्के बाहेर काढले आहेत. मुख्यमंत्री लाकडी बहिण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना वीजबिल माफीची घोषणा केली. पवार यांनी विधानसभेत ही घोषणा करताच सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत सत्ताधारी आमदारांनी आनंद व्यक्त केला.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सरकार मोठ्या घोषणा करेल असे अपेक्षित होते. त्यानुसार दादांनी आपल्या लाल रंगाच्या बॅगमधून एक एक करीत योजना बाहेर काढल्या. सगळ्यात पहिले दादांनी वारकऱ्यांसाठी महामंडळाची घोषणा केली. त्यानंतर वारीला जागतिक वारसा जाहीर करण्याची घोषणा झाली. 

शेतकऱ्यांसाठी एकएक करीत दादा घोषणा करीत होते. सौर कृषिपम्प मिळेल असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर दादांनी पूर्ण अर्थसंकल्प ऐकून घ्या. घाई करू नका, पुढे भरपूर काही आहे, असे सांगितले. त्यानंतर शेरोशायरी करीत दादांनी अर्थसंकल्प मांडणे सुरू ठेवले. दुपारी पावणे तीनच्या सुमारास दादा शेतकऱ्यांच्या विजेच्या मुद्द्याकडे वळले. राज्यात किती शेतकरी आहेत याची संख्या त्यांनी सांगितली. शेतकऱ्यांना किती वीज लागते हे देखील त्यांनी नमूद केले.

Maharashtra Budget : दादांच्या पोटलीतून ‘सीएम लाडकी बहिण योजना’

लागलीच त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दादांच्या या घोषणेनंतर सभागृहात शिवाजी महाराजाच्या नावाचा जयजयकार करण्यात आला.

पेन ड्राइव्ह’मध्ये अर्थसंकल्प

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘पेन ड्राइव्ह’च्या माध्यमातून आमदारांना उपलब्ध करून देण्यात आला. अर्थसंकल्पाच्या सुटकेस देखील दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देण्यात आल्या. अतिरिक्त अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील शेतकरी, गृहिणी, तरूणांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला. त्यामुळे एकापाठोपाठ योजना जाहीर होत गेल्या. विरोधी बाकांवरील नेतेही अर्थसंकल्प शांतपणे ऐकत होते. दादा मतदारांना काय देतात, कितपत देतात यावर विरोधी पक्षाचे लक्ष होते. पांढरा कुर्ता पायजामा, लालसर जॅकेट आणि अर्थसंकल्पाची कागदपत्र असलेली बँग असा दादांचा विधानभवनातील लूक होता.

व्यत्यय आणणाऱ्यांना दम

दादांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना विरोधी बाकांवरील काहींनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना दादांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. शेतकऱ्यांबाबत बोलत असतानाही विरोधी बाकांवरून आवाज आलेत. त्यावेळी दादांनी सर्वांना धीर धरण्याचा सल्ला दिला. अनेक सरकारमध्ये अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 28) दादांनी विधिमंडळात दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफीची योजना जाहीर केली. सौर ऊर्जा प्रकल्पाचीही घोषणा केली. एकूणच आपल्या बॅगमधून दादांनी काढलेल्या योजनांचा फायदा विधानसभा निवडणुकीत होतो का, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना विद्यापिठात कॅन्टीन, पाणी, अन्न, मुलींची सोय, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणार असल्याचं सागितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!