महाराष्ट्र

BJP Politics : दादांना महायुतीतून काढा

Party Activists : अजित पवार सोबत असतील तर अशी सत्ता आपल्याला नको !

Pune : अजित पवार यांचा महायुतीतील सहभाग भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील खटकायला लागला आहे. भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ज्या भाजप कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी अक्षरश: चिरडले, त्याच अजित पवारांना आमच्या बोकांडी बसवले, अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत अजित पवार असतील तर असली सत्ता आपल्याला नको, अशा टोकाच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

शिरुर लोकसभेची आढावा बैठक 27 जून गुरुवारी पुण्यात पार पडली. त्या बैठकीत भाजपचे आमदार राहुल कुल देखील होते. राहुल कुल यांच्या समोरच सुदर्शन चौधरींनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी केली. लोकसभेचे निकाल लागल्या पासूनच, भाजपसोबत अजित पवारांचे खटके उडू लागलेत. आधी संघानं आपल्या मुखपत्रातून अजित पवारांना घेण्याची गरजच काय होती,

Navneet Rana : ओवैसींची खासदारकी करा रद्द

अशी टीका करतानाच भाजपचीच ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचं म्हटलं. पुण्यात भाजप आणि संघाच्या बैठकीतही दादांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्याचं सांगत पराभवाचं खापर अजित पवारांवरच फोडण्यात आलं. आता पुणे जिल्ह्याच्या भाजपच्या उपाध्यक्षांनीच अजित पवारांना महायुतीतून काढा असं म्हटल आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांना भरडण्याचे काम

कार्यकर्त्यांचे मन काय सांगते हे ऐकून जर निर्णय घेणार असाल, तर अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा. त्यांनी आजवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आमच्या अनेक लोकांना महामंडळ भेटले असते मंत्री झाले असते. अजित पवार जर आमच्यासोबत राहणार असतील तर अशी सत्ताच आम्हा भाजप कार्यकर्त्यांना नको. गेले दहा वर्ष झाले आम्ही त्यांच्याशी दोन हात करत आहोत मात्र आता त्यांच्यासोबतच हात मिळवणे यात काय अर्थ आहे? अजित पवार सोबत असतील तर विधानसभेची सत्ता नको, भाजप पदाधिकाऱ्याना खदखद चौधरींनी बोलून दाखवली.

Chandrapur Congress : पक्षविरोधी कारवाया भोवल्या; देवतळे यांचे निलंबन

आम्ही काय अजितदादांसाठी सत्ता आणायची का? पालकमंत्री होऊन त्यांनी बॉस व्हायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भरडण्याचे काम होणार असेल तर सत्ता आम्हाला नको. आमच्या लोकांना आमदार होऊ द्या, त्यांनी पक्ष वाढवला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आहे.

तर ते दोघे मंत्री झाले असते

अजित पवार यांनी राहुल कुल आणि योगेश टिळेकर यांच्यावर अन्याय केला आहे. नाहीतर आता हे दोघेही मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावंडे अजित पवार यांच्याकडे निधी मागायला गेले तर तुमचा काय संबंध, १० टक्के निधी देऊ, असे ते म्हणाले. अरे असली सत्ता आपल्याला कशाला हवी, अशा उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!