Mumbai : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे, शेतकरी वेगाने कामाला लागला आहे. बळीराजाला शासकीय योजनांचा योग्य व तात्काळ लाभ मिळून देण्याकरिता मी प्रयत्नशील असल्याचे सांगत चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली.चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील पंतप्रधान किसान सन्मान योजना तसेच नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी मनुष्यबळ वाढावे तसेच पीक विमा योजनेची उर्वरित 51.31 कोटी रुपयांची अप्राप्त रक्कम तातडीने मिळावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन देखील मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे दिले. चर्चादरम्या कृषिमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले की, खरीप हंगाम 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन लाख 50 हजार 969 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढला होता. खरीप हंगाम सन 2023-24 मध्ये सोयाबीन वरील ‘येलो मोझॅक’ व बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. तसेच अवकाळी पावसामुळे कापसाचे नुकसान होऊन उत्पादन घटले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलणे भाग असल्याचेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
पीक विमा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 91.62 कोटी रुपये प्राप्त होणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ 40.31 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. उर्वरित 51.31 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम पीक विमा कंपन्यांकडून प्राप्त झालेली नाही.
सद्यस्थितीत खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली असून, मागील पीक विमा रकमेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सदर उर्वरित पीक विम्याची रक्कम तातडीने जमा होण्यासंदर्भात पीक विमा कंपन्यांना निर्देशित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच पीक विमा योजनेच्या थकीत रकमेची शेतकऱ्यांसाठी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
Assembly Session : फडणवीस-ठाकरे एका लिफ्टमध्ये ; दरेकरांना बाहेर काढले
कृषी विभागात मनुष्यबळाचा अभाव
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान म्हणून दिला जातो. तसेच राज्य शासनामार्फत नमो किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची कारवाई कृषी विभागामार्फत सुरू असून, यामध्ये शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे, आधार प्रमाणे भूत करणे, जमीन नोंदणी करणे, आदी इत्यादी कामे अंतर्भूत आहेत; परंतु कृषी विभागामध्ये कमी मनुष्यबळ असल्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होण्यास त्रास होत आहे. असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, कृषी विभागाने यासंदर्भात योग्य कार्यवाही करावी, ही कामे करण्यास संगणक ऑपरेटर मदत घेत त्या मार्फत ही कामे करण्यात यावी, अशी मागणी देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना केली आहे.