महाराष्ट्र

Gondia Politics : गोंदियात महायुतीला विरोध

Assembly Elections : पक्षनिरीक्षकांसमोर भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सुर

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच प्रमुख पक्षांच्या वरीष्ठ पातळीवर या निवडणुका मित्रपक्षांसोबत लढण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर वेगळाच सूर आवळला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा भाजपने स्वबळावर लढवाव्यात अशी भावना काही पदाधिकाऱ्यांनी पक्षनिरीक्षकांसमोर व्यक्त केल्याची माहिती आहे. गोंदियातून महायुतीला होत असलेल्या या विरोधामुळे त्याचे परिणाम राज्यातील गठबंधनावर काय पडतात, याकडे लक्ष लागले असेल. अशात भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीला थेट विरोध केल्याने जिल्ह्यात पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्षाकडून पराभवाची कारणे शोधण्यासाठी जिल्ह्यानिहाय पक्षनिरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षकांकडून बैठक घेऊन आढावा घेतला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने सामोरे कसे जाता येईल, याविषयी चर्चा केली जात आहे. गोंदिया जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून भाजपने माजी मंत्री रणजित पाटील यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.

पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेतली. यावेळी जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक जिल्ह्यातील चारही विधानसभा भाजपने स्वबळावर लढाव्यात, अशी भावना पक्षनिरीक्षक रणजित पाटील यांच्यासमोर व्यक्त केली. भाजपने लोकसभा निवडणूक महायुती सोबत लढल्यानंतरही पक्षाच्या मताधिक्यात कुठलीच वाढ झालेली नाही. भाजपला फारसा फायदा झाला नसल्याची बाब पदाधिकाऱ्यांनी पक्षनिरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती आहे. पण यावर भाजपचे पदाधिकारी स्पष्टपणे बोलण्यास टाळत आहेत. पक्षाची नव्हे तर काही पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Gondia News : रखडलेल्या कामांवरून आमदार संतापले

अर्जुनी मोरगावचा पेच

पक्षनिरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेत त्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव जरी झाला असला तरी मताधिक्य कमी झालेले नाही. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या दमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. यात खरा पेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) वर्चस्व आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे करत आहेत. हा मतदारसंघ भाजपचासुद्धा गड राहिला आहे. त्यामुळे माजी मंत्री राजकुमार बडोले हे सुद्धा तयारीला लागले आहेत. दुसरीकडे या मतदरासंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे महायुतीत या मतदारसंघाचा पेच कसा सुटणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!