Political News : जय विदर्भ पक्षाच्या वतीने नागपुरात रस्त्यावर आंदोलन सुरू होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत गाडीतून खाली उतरून आंदोलनाकडे मोर्चा वळवला. आंदोलनाचे निवेदन घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत लोक संभ्रमात आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
हे प्रीपेड मीटर सुरुवातीला फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये बसविले जातील. जोपर्यंत जनतेच्या मनातील संभ्रम दूर होत नाही. तोपर्यंत ज्या औद्योगिक ठिकाणी तोटा आहे, अशा ठिकाणीच हे स्मार्ट मीटर लागणार आहेत. यावर विधिमंडळातही चर्चा होईल, त्यानंतर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील. असे बावनकुळे म्हणाले.स्मार्ट मीटर मुळे विजेचा खर्च निम्म्याने कमी होईल.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज ग्राहक मोबाईल फोन प्रमाणेच विजेचे पैसे भरतील. वीजेवर किती खर्च करायचा हे ग्राहक निवडू शकतात. ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनद्वारे नियमितपणे किती वीज वापरली जाते याची माहिती मिळेल. असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. काही ठिकाणी आमचा विजय सुद्धा झाला आहे. यामध्ये आम्ही बूथनुसार विश्लेषण केले आहे. अहवाल दिल्लीत केंद्रीय पक्षाकडे सादर केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अद्याप चर्चा झालेली नाही. विधान परिषदेसाठी काही नावे आमच्याकडे आली आहेत. ती आम्ही पार्लियामेंट्री बोर्डाकडे पाठवली आहेत. यात नावांवर चर्चा झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.