Akola : राज्यात दोन वर्षांपासून अनेक महापालिकांवर प्रशासक राज सुरू आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभे नंतर तरी स्थानिक स्वराज् संस्थांची निवडणूक होईल , अशी आशा व्यक्त केली जात आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
अशात अकोला महापालिकेला उद्देशून शहराच्या मुख्य चौकात लागलेल्या बॅनरची चर्चा रंगू लागली आहे. बॅनर वरील मजकुरामुळे राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. अज्ञात व्यक्तीने ‘अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण?’ असा प्रश्न विचारणारा बॅनर लावला आहे. त्यामुळे बॅनर लावणारा आणि भ्रष्ट ‘तो’ कोण? हीच चर्चा सर्वत्र आहे.
लोकसभा निवडणुक संपली आहे. मात्र राजकीय वातावरण अजूनही चांगलेच तापले आहे. लवकरच विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी राजकीय रंग चढायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीही प्रतीक्षा आहे.
Jayant Patil : अपक्षांनाही ‘तुतारी’मुळे राष्ट्रवादीचे नुकसान
महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार याकडेही लक्ष लागून आहे. राज्यात प्रसिद्ध असलेली अकोला महापालिका नेहमी चर्चेत असते. 2001 मध्ये स्थापन झालेल्या अकोला महापालिकेला आजही अकोलेकरांना मूलभूत सुविधा पुरवणे शक्य झाले नसल्याचे समोर आले आहे. अकोला महापालिकेत फोफावलेला अनियंत्रित भ्रष्टाचार, त्याचा कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अकोला महापालिकेतील अनेक प्रकरणे पाहिली तर महापालिके विषयी निश्चितच चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्वात गरीब महापालिका पैकी एक असणाऱ्या अकोला महापालिकेला भ्रष्टाचार सर्वार्थाने लुटत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा ही महापालिका चर्चेत आहे.
निर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्तेचा कालावधी संपल्यानंतर अकोला महापालिका बरखास्त होऊन दोन वर्षे उलटली. यापूर्वी आर्थिक डबघाईला आल्यामुळे 2011 मध्ये काँग्रेसची सत्ता असलेली अकोला महापालिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बरखास्त केली होती. 8 मार्च 2022 रोजी अकोला महानगरपालिकेची मुदत संपली. त्यानंतर मनपावर प्रशासक राज लागण्यापूर्वी अकोला महापालिकेत भाजप सत्तेत होते. त्यानंतर महापालिकेची निवडणूक केव्हा होणार हाच प्रश्न विचारला जात होता.
‘तो’ बॅनरबाज कोण?
अकोला शहरातील मुख्य चौकात लागलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र नेमका कुणी हा बॅनर लावला याबाबत कुणीही सांगायला तयार नाही. यामागे कोण आहे. त्याचा शोध घेण्यात येणार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमधील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा सध्या अकोलेकरांमध्ये आहे. पण प्रश्न उपस्थित होतो. तो लावणारा नेमका कोण आहे. अन तो भ्रष्ट नेता कोण ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा अनेक जण प्रयत्न करीत आहेत.