Marathi Language : अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो खासदारांच्या शपथविधीचा. आगामी पाच वर्ष संसदेत कसं चित्र दिसणार आहे, याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसली. नवनिर्वाचित खासदार यांचा शपथविधी सुरु असतांना इंडिया आघाडीचे खासदार संविधानाचे पुस्तक दाखवित होते. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेतली. यामध्ये खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
खासदारांचा शपथविधी 24 जून रोजी संसद भवनात पार पडला. प्रथम सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर मागील सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहिली शपथ पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. या वेळी अनेक खासदारांनी राज्यभाषेत शपथ घेतली. यामध्ये महारष्ट्रातील खासदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्री करण्यात आले आहे. 24 जून सोमवारी 18व्या लोकसभेचा सदस्य म्हणून या तिघांनी मराठीत शपथ घेतली. या शपथेचा व्हिडीओ या तिन्ही खासदारांनी पोस्ट केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली.
तिघांनी घेतली शपथ
“मी…लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे. परमेश्वरास स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रति अनंत श्रद्धा आणि निष्ठा बाळगणार. भारतीय संविधानाचे आणि एकतेचे रक्षण करणार. जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे, ते मी नेकीने पार पाडेन” असं म्हणत शपथ घेतली. याची चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
जाधवांचा चौकार
सलग चौथ्यांदा निवडून येत खासदार प्रतापराव जाधव यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे. आयुष (स्वतंत्र प्रभार) व कुटुंब आरोग्य कल्याण राज्यमंत्रिपदी त्यांची वर्षी लागली. लोकसभा सदस्यपदी सलग चौथ्यांदा मराठीतून शपथ घेत प्रतापराव जाधव यांनी मराठी बाणा जपला आहे.
24 जून रोजी जाधव यांनी मायबोली मराठीतून लोकसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. यंदाची 18 वी लोकसभा असून लोकसभेचे पहिले अधिवेशन 25 जून पासून सुरू झाले आहे. अधिवेशनासाठी हंगामी लोकसभा सभापती म्हणून मातृहरी मेहताब यांची निवड करण्यात आली. दरम्यान, निवडून आलेल्या सर्वच लोकसभा सदस्यांनी संसद भवनात सदस्य पदाची शपथ घेतली.