Maratha Reservation : मराठा आरक्षणानंतर आता राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू नये, अशी मागणी ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
ज्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये आजही मराठा समाजाकडून सर्वच नेत्यांना विरोध करण्यात येत आहे. असे असतानाच आता जालना जिल्ह्यातील एका गावामध्ये ओबीसी नेता वगळता इतर समाजातील नेत्यांना गावात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील अनेक गावांमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती.
आता लक्ष्मण हाकेंच्या उपोषणानंतर काही गावांमध्ये गावबंदीचे पोस्टर लावल्याचे समोर आले आहे. परंतु या गावांमध्ये ओबीसी नेत्यांना सोडून इतर सर्व नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात आणि परभणीच्या मोहाडी, तालुका जिंतूर गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर “एकच पर्व, ओबीसी सर्व” ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्याने गावात प्रवेश करू नये. अन्यथा मोठा अपमान केला जाईल,” असा उल्लेख होता.
बॅनरवर ओबीसी नेत्यांच्या फोटो
जालन्यातील परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात आणि परभणीच्या मोहाडी, तालुका जिंतूर गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश, असे पोस्टर्स लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गावकऱ्यांचा हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
‘त्या’ बॅनरमुळं नवा वाद, बॅनर हटवले
राज्यातील रायगव्हाण आणि मोहाडी या गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. या बॅनरवर “एकच पर्व, ओबीसी सर्व” ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्याने गावात प्रवेश करू नये. अन्यथा मोठा अपमान केला जाईल,” असा उल्लेख होता. या बॅनर वरून राज्यात नवीन वाद सुरु झालेले असताना दोन्ही गावांतील बॅनर काढण्यात आले आहेत.