महाराष्ट्र

Gadchiroli : माओवादी चळवळीच्या उच्चाटनात यश

Naxal Movement : मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसमर्पण

Devendra Fadnavis : पोलिसांच्या कारवाईमुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीचे उच्चाटन शक्य झाले आहे. माओवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. लवकच महाराष्ट्र माओवादमुक्त झालेला दिसेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यावेळी फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले.

फडणवीस यांनी यावेळी गिरधर व त्यांच्या पत्नीला संविधानाची प्रत भेट दिली. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी माओवादी दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली. आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा घेण्यात आला. माओवाद्यांच्या कुटुंबीयांशी संवादीर साधण्यात आला.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

चळवळ कमकुवत

गडचिरोलीत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरधर आहे. गिरधर 25 लाखांचे बक्षीस होते. त्याच्या पत्नीवर 16 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ माओवादी कमांड असलेल्या या दोघांनी आत्मसमर्पण केल्याने चळवळ कमकुवत झाली आहे. माओवादी कारवायांचे प्रमुख म्हणून या दोघांकडे पाहिले जायचे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती माओवादी चळवळीत सहभागी झालेला नाही. हे पोलिस दलाचे यश आहे.

फडणवीस यांनी सी-60 पथकाचे कौतुक केले. या पथकाने आपला दरारा निर्माण केला आहे. त्यामुळे माओवादी शरणागती पत्करत आहे. तसे न केल्यास त्यांना बंदुकीचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. हे सी-60 पथकाचे मोठे यश आहे.

Amravati : पालकमंत्री शेजारी असताना ठाकूर, वानखेडेंनी तोडले कुलूप

गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न माओवाद्यांनी केला.

व्यापक विकास

गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यात आता विकास पोहोचत आहे. अनेक दुर्गम भागात जाऊन हे पाहता आले. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न होत आहे. मोठी गुंतवणूक जिल्ह्यात येत आहे. काही प्रकल्पांबाबत बैठक झाली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आदिम जमातींसाठी 24 हजार कोटींची योजना सुरू झाली आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन होत आहे. द्रौपदी मुर्मू या देशातील पहिल्या आदिवासी महिला आहेत. यातून सरकार आदिवासींना बळ देत आहे.

पोलिस भरतीला वेग

पोलिस भरतीला स्थगिती देणे अवघड आहे. 17 हजार पदांची भरती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तसे झाल्यास भरती प्रक्रिया पुढच्या वर्षावर जाईल. त्यानंतर आणखी नऊ हजार पोलिस भरती करायची आहे. ती एक वर्ष लांबणीवर जाईल. त्यामुळे जेथे पाऊस आहे, तेथे दुसरी तारीख देऊन भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोलीत केवळ स्थानिकांचीच भरती केली जात आहे. उमेदवारांच्या वयाचे नुकसान होऊ नये, असे सांगून पोलिस भरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. माओवादी चळवळीत एकही व्यक्ती भरती नाही. दसरी कडे पोलिस दलात भरतीसाठी 28 हजार अर्ज येतात. यातून नागरिकांचा संविधानाप्रती व्यक्त विश्वास दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!