Political Party Change : भाजपमधून बाहेर पडलेले एकनाथ खडसे यांची पुन्हा घरवापसी होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. खडसे परत आल्यानंतर त्यांना कोणते पद देण्यात येणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे नेमके काय होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात भाजपच्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
नागपूर येथे बुधवारी (ता. 19) बोलताना बावनकुळे यांनी खडसेंच्या पक्षप्रवेश आणि पदाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे अद्याप भाजपमध्ये आलेले नाहीत. ते येणार आहेत अशा चर्चा ऐकण्यात येत आहेत. परंतु ते भाजपमध्ये केव्हा येणार, नक्की येणार का याबद्दल चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे त्यावर आताच खूप विस्ताराने बोलणे चुकीचे होईल, असे बावनकुळे म्हणाले. कोणी पक्षात आलेले नसताना त्यांना कोणते पद देण्यात येईल यावर चर्चा करत बसते व्यर्थ असल्याचे ते म्हणाले.
मराठा, ओबीसींनी निश्चिंत राहावे
मराठा, ओबीसी समाजाने आरक्षणासंदर्भात निश्चिंत राहावे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही. राज्याच्या सरकारने याबाबतची काळजी सरकारने घेतली पाहिजे. अशीच भूमिका पहिल्यापासून आहे. त्याच पद्धतीने काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. ओबीसी समाजाच्या मागण्यांची पूर्तता होत आहे, असे ते म्हणाले.
समन्वय समिती लवकरच
महायुतीच्या समन्वय समितीची नेमणूक लवकरच होईल. भाजपचे विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव आल्यानंतर यावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत महायुती चांगला ‘परफॉर्मन्स’ करेल. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कमी जागा आल्यात. परंतु विधानसभा निवडणणुकीत ही कमी राहणार नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात राबविण्यात येतील. त्याचा मतदारांना नक्की फायदा होईल असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Congress : प्रियंका गांधींमुळे लोकसभेत विरोधक मजबूत : शशी थरूर
भ्रम पसरविला
काँग्रेसने देशभरात भ्रम पसरविला. संविधान बदलण्यात येईल अशी भीती लोकांना दाखविली. आरक्षण कायमचे संपेल असे धादांत खोटे सांगितले. अनेक मतदार या भ्रमाला बळी पडले. महायुतीने लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली. विधानसभा निवडणूकही याच मुद्द्यावर लढविण्यात येणार आहे. मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे ते विधानसभा निवडणुकीत नक्की साथ देतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.