Chennai : पुणे पोर्श कारचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक हायप्रोफाईल हिट अँड रन प्रकरण पुढे आले आहे. चेन्नईमध्ये एका खासदाराच्या मुलीने आलीशान कार फुटपाथवर चढवून झोपलेल्या व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर दिवस उजाळताच खासदाराच्या आरोपी मुलीला जामीन देखील मंजूर झाला.
वायएसआर काँग्रेस पार्टीचे राज्यसभा खासदार बिदा मस्तान राव यांची मुलगी विडा माधुरीने सोमवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये एका व्यक्तीला कारने चिरडले. विडा माधुरीने बीएमडब्ल्यू कार थेट फुटपाथवर चढविल्याने या घटनेत सूर्या नावाच्या 21 वर्षीय चित्रकाराचा मृत्यू झाला. त्यानंतर माधुरीला अटक करण्यात आली. मात्र मंगळवारचा दिवस उजाळताच आरोपी माधुरीची जामिनावर सुटका झाली. पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मे रोजी एका श्रीमंत व्यक्तीने त्याच्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. त्यात एका महिलेसह दोन तरुण सॉफ्टवेअर व्यावसायिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोपीला सध्या पुण्यातील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
चेन्नई पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री बेसंत नगर येथील कलाक्षेत्र कॉलनीमध्ये एका प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या 21 वर्षीय तरुणाला एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने चिरडले, परिणामी त्याचा मृत्यू झाला. वायएसआर काँग्रेसचे आंध्रप्रदेशचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी बीडा माधुरी असे वाहन चालकाचे नाव आहे. मृताचे नाव ओडैकुप्पम, बसंत नगर येथील सूर्या असे असून तो व्यवसायाने चित्रकार आहे.
Police Bharti : सर्वत्र विरोध तरीही पोलीस भरती प्रक्रिया सुरू
पोलिसांनी नोंदविले निष्काळजीपणामुळे मृत्यू
घटनेनंतर माधुरी तात्काळ घटनास्थळावरून पळून गेली. मात्र तिची मैत्रिण गाडीतून खाली उतरली आणि अपघातानंतर जमलेल्या लोकांशी वाद घालू लागली. काही वेळाने ती देखील तिथून निघून गेली. गर्दीतील काही लोकांनी सूर्याला शासकीय रॉयपेट्टा रुग्णालयात नेले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अड्यार वाहतूक पोलिसांनी आयपीसी कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी कार मालकाला नोटीस बजावली आहे. 2022 मध्ये राज्यसभेचे खासदार झालेले बिडा मस्तान राव याआधीही आमदार राहिले आहेत, बीएमआर ग्रुप या सीफूड उद्योगात त्यांचे आघाडीचे नाव आहे.