OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालन्यामधील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खलावली त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तोरोको आंदोलन केले. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. आंदोलनकांनी महामार्गावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळावर पोलिस दाखल झाले आणि वाहतूक कोंडी सोडविली.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून. 18 जून मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उच्च रक्तदाब आणि शुगर वाढली असून, त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी विनंती केली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनाही सध्या उपचाराची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सरकारचे दुर्लक्ष
दरम्यान लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत 18 जून मंगळवारी ओबीसी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला. ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. धुळे -सोलापूर महामार्ग ओबीसी आंदोलनकांनी रोखून धरला होता. लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली तरी देखील सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी रस्त्यावर टायर जाळन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे मुख्यमंत्री आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलकांनी काल अचानक रस्तारोको सुरू केल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. पोलिस आंदोलकांना समजविण्याच्या प्रयत्न केला. लक्ष्मण हाके यांनी विनंती केल्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी महामार्ग मोकळा करून दिला. आता वाहतूक सुरळीत झाली आहे. सध्या याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही
यावेळी एका आंदोलकाने सांगितले की, आमच्या संघर्षयोद्धा लक्ष्मण हाके यांनी सहा दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे तहसिलदार, कलेक्टर किंवा सरकार आलेले नाही. आमच्या संघर्षयोद्धांची तब्येत खालावली आहे. आम्हाला ते बघवत नाही. जर त्यांना काही जीवितहानी झाली तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.’, असा इशारा संतप्त आंदोलनकांनी दिला आहे.