Karnataka Government : कर्नाटकाच्या शिवमोग्गा शहरातील गोपी सर्कल येथे भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळपासून आंदोलनात सहभागी असलेले भानुप्रकाश अचानक कोसळले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी रुग्णालयातील डॉक्टरांनी केली.
कर्नाटकातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात पक्षाने केलेल्या निषेधादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार एमबी भानुप्रकाश यांचे 17 जून सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे आंदोलनाचे नेतृत्व केले आणि कोसळण्यापूर्वी कामगारांना संबोधित केले. भानुप्रकाश हे 69 वर्षांचे होते.
शनिवारी 15 जून रोजी कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकरात वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.5 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात भाजपने 17 जूनला राज्यव्यापी आंदोलन केले. कर्नाटकातील सर्व जिल्हा मुख्यालयात हे आंदोलन करण्यात आले.राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या विरोधात निदर्शने केली. राज्य सरकारच्या जनविरोधी भूमिकेविरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Aditya Thackeray : वायकरांना बरखास्त करा, कीर्तीकरांना विजय घोषित करा
जनतेमध्ये रोष
“सरकारला हे लक्षात आले की हमीभाव बंद केल्याने जनतेचा रोष निर्माण होईल. हे हमीभाव चालू ठेवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, म्हणून त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली,” असे विजयेंद्र म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकात नऊ जागा जिंकल्या. भाजपने 17 जागा जिंकल्या.