महाराष्ट्र

Buldhana : खडसे-महाजनांनी एकत्र यावे : रक्षा खडसे

Raksha Khadse : जळगावच्या विकासासाठी दोघांचीही गरज

Jalgaon Constituency : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. खडसेंच्या यांच्या सुन रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी खडसे-महाजन यांच्यातील वादावर देखील विधान केले. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र यायला पाहिजे हे आधीपासूनच प्रयत्न राहिले आहेत. आता जर वरिष्ठांची साथ राहिली आशीर्वाद राहिले तर हे दोन्ही नेते लवकरच सोबत दिसतील आणि पक्षासाठी चांगलं काम करतील, असा विश्वास देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी संत नगरी शेगावमध्ये पोहचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विश्राम भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना दोन्ही नेत्यांमधील संघर्षाबाबतही विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना दोन्ही नेत्यांनी आता आरोप-प्रत्यारोप थांबवून जळगावच्या विकासासाठी एकत्र यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ना. रक्षा खडसे पुढे म्हणाल्या, परिवारासह मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी संत गजानन महाराज यांच्याकडे विनंती केली होती की, निवडणुकीतील तिकीट मिळण्यापासून ते निवडून यावे यासाठी प्रार्थना केली होती. त्याच अनुषंगाने आज परिवार आणि कार्यकर्त्यांसह श्री चरणी आपण माथा टेकला. देशाच्या उज्वल भविष्यासाठी अधिक काम करण्यासाठी बळ मिळो, अशी मागणी यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले.

Bhandara Gondia Loksabha- कुणापेक्षाही जास्त जनसंपर्क ठेवला तरीही

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

‘गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र येऊन जळगाव जिल्ह्यासाठी काम केलं, तर त्याचा फायदा येथील जनतेला होईल. दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी मागच्या काही वर्षांपासून दोघांमध्ये संघर्ष आणि वादविवाद बघितला आहे. पण माझी इच्छा आहे, की दोन्ही नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकेकाळी हे दोघे नेते एकत्र होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी मोठे काम केले आहेत. मात्र, आता दोघांनी एकमेकांवरचे आरोप थांबवून एकत्र येण्याची वेळ आहे’, असे रक्षा खडसे म्हणाल्या.

पक्षप्रवेशाचा निर्णय वरिष्ठांचा

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारलं असता, ‘एकनाथ खडसे मोठे नेते आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय आमचे केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेते घेतील. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप घडतीलच’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भारतीय जनता पार्टीबरोबर जेवढी जास्त लोक जोडता येतील, तेवढे चांगले आहे. त्यामुळे संघटनेची ताकद वाढणार आहे. एकनाथ खडसे तर भारतीय जनता पक्षाचे जुने नेते आहेत, असेही त्या म्हणाल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!