महाराष्ट्र

Nana Patole : मोदी असूनही हैराण, स्वतः राहतील तेव्हा काय?

Bhandara Gondia : ‘गिरे तो भी उलटी टांग’ अशी भाजपची स्थिती..

Vidhan Sabha : महाराष्ट्रात भाजपची मते मोठ्या फरकाने कमी झाली आहे, मोदींच्या चेहऱ्यावरही महाराष्ट्रात पाच टक्के फरकाने भाजप मागे आहे. जेव्हा स्वतःच्या चेहऱ्याच्या निवडणूक होतील तेव्हा किती टक्क्यांनी मागे जाल? असा प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग मतदारसंघात मी पिछाडीवर राहील, असं वातावरण तयार केल होत. जिंकण्यासाठी मित्र पक्षासह मला काँगेसने ही मदत केली असे विधान केले होते. यावर नाना पटोले म्हणाले की, ‘गिरे तो भी उलटी टांग’ अशी स्थिती भाजपची झाली आहे. भाजप मूळ मुद्द्यांना बगल देत आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न,पाणीटंचाईचा प्रश्न यावर बोलायला भाजपला वेळ नाही आहे, असेही नाना म्हणाले.

जनतेचे प्रश्न दूर सारून राज्याचे तिजोरी लुटण्याचे पाप या सरकारने केले आहे, असा आरोपही नानांनी केला आहे. महाराष्ट्राला बरबाद करण्यासाठी तुम्हाला सत्ता दिलेली नाही. राज्याची प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेऊन त्यावर कर्ज घेऊन सुरु केलेला भ्रष्टाचार थांबवा, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. शेतकरी गरीब आणि युवकांना न्याय द्या. भंडारा येथे बोलत असताना अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Bhandara Gondia : नानांचा विजय, रोखणार का ‘सेवक’?

अलायन्स करूच!

आमची 288 जागांवर संघटनात्मक तयारी सुरु झाली आहे. याचा अर्थ स्वबळावर आम्ही लढतोय असे नाही, आम्ही आमच्या मित्र पक्षाबरोबर अलायन्स करूच. असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या विजयानंतर महाविकास आघाडीची कामगिरी लक्षात घेता, आघाडीचे नेते आपसी आघाडी धर्म पाळताना दिसत आहेत. आपसात कोणतेही वाद होऊ नये, याची काळजी घेताना दिसत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वरील वक्तव्यावरून, हेच स्पष्ठ होताना दिसत आहे.

पूर्वनियोजित दौरा

मुंबई येथे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली असताना, आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या गृह भंडारा जिल्हाच्या दौऱ्यावर पहायला मिळाले. नानांच्या अनूपस्थितिने राजकीय वातावरण तापले असताना अखेर नानांनी त्यावर खुलासा केला आहे. माझा भंडारा जिल्हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे मी आघाडीच्या बैठकीला जात नाही आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात यांना पाठवल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाना पटोले नाराज असल्याच्या बातम्यांवर नानांनी स्वतः पडदा टाकला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!