महाराष्ट्र

Vijay wadettiwar : वडेट्टीवार संतापले, अधिकाऱ्यांची काढली खरडपड्डी अन् सरकारला

Gadchiroli Hospital : गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Political War : राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात चाललेला गलथान कारभार बघून ते चांगलेच संतापले. जनसामान्यांना उद्भवणार त्रास व असुविधांबाबत मिळालेल्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून असंवेदनशीलपणाचा कळस गाठणाऱ्या सरकारला त्यांनी चांगले धारेवर धरले.

गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवेची अवस्था बिकट झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे. प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवविणे. रात्रपाळीत वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिति. रुग्णालयातील लिफ्ट बंद. फायर ऑडिट होऊनदेखील योग्य खबरदारी घेतलेली नाही. रुग्णालयातील रिक्त पदे व कोविडमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढले, अशा अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या.

रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन नित्याचेच झाले आहे.यावरून विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक, अतिरिक्त शल्यचिकित्सक तसेच वैद्यकीय अधिकारी व विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. सोबतच अग्निशमनाबाबत जी कामे रेंगाळलेली आहे, त्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांना खडेबोल सुनावले. अग्निशमना संदर्भात ठप्प असलेली कामे त्वरित पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले.

जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एमआरआय, एनजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सुविधा नाहीत. गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत आहे. अशा दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खोरी यातच सरकार गुंतले घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला.

जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीदेखील आहेत. गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला योग्य न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Lok Sabha Election : होय..! आम्ही कमी पडलो, पटेलांची कबुली !

जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरिता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावी. जिल्ह्याच्या रक्त साठ्यात भर घालावी, अशी विनंतीदेखील पोलिस विभागाला करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!