महाराष्ट्र

Bhandara Politics : लोकसभेच्या निकालाने बदलवले भंडाऱ्यातील सत्ता समीकरण !

BJP : भाजपची मते आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी धोक्याची घंटा.

MLA Narendra Bhondekar : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाने शिवसेना शिंदे गट समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज झाले. हा पराभव भाजपचा नसून महायुतीचा असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते महायुतीमधील कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढतात, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. यातच महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कुणाला मिळते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. तरी आमदार भोंडेकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

असा आहे इतिहास..

2009मध्ये नरेंद्र भोंडेकर हे पहिल्यांदा अविभाजीत शिवसेनेकडून निवडून आले होते. 2014मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने ही जागा भाजपचे अॅड. रामचंद्र अवसरे यांनी जिंकली. 2019मध्ये युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे भोंडेकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि ते बहुमताने निवडून आले. अपक्ष असल्यामुळे त्यांनी पहाटेच्या सत्तास्थापनेला पाठिंबा दिला होता. परंतु, तीन दिवसांतच ते सरकार कोसळले. त्यानंतर महाविकास आघाडीचा नवीन प्रयोग अस्तित्वात येताच त्यात सहभागी झाले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या उलथापालथीत शिंदे गटात जावून आमदार भोंडेकर महायुतीत सहभागी झाले.

महायुतिचा पराभव अन्..

नुकत्याच लोकसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला 1 लाख 22 हजार 428 मते तर भाजपला 99 हजार 575 मते मिळाली. तर काँग्रेसला 22 हजार 853 मते अधिक आहेत. ही मते आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जागा वाटपात भाजप ही जागा आपल्याकडे खेचून उमेदवारी कुणाला देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्याविरूद्ध महाआघाडी ही उमेदवारी कुणाला देते त्यावर समिकरणे अवलंबून राहणार आहेत.

भंडारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (शिवसेना शिंदे गट) हे करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश आले असते तर भाजपकडून उमेदवारी मागण्याची शक्यता होती. परंतु, महायुतीत ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, ते पाहणे महत्त्वाचे आहे. याशिवाय भाजपकडून अनुप ढोके, आशिष गोंडाणे,तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) महेंद्र गडकरी, चेतक डोंगरे हेसुद्धा इच्छूक आहेत.

दुसरीकडे लोकसभेच्या विजयामुळे महाआघाडीचे मनोबल उंचावले आहे. या जागेसाठी तिन्ही पक्ष दावेदारी करीत असले तरी ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसकडून माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सभापती मदन रामटेके, राजकपूर राऊत हे इच्छूक आहेत. शिवसेना (उबाठा गट) नरेंद्र पहाडे हे प्रमुख दावेदार असून दीपक गजभिये हेसुद्धा इच्छूक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी (शरद पवार गट) अजय मेश्राम पक्षाकडे दावेदारी करणाऱ्यांच्या शर्यतीत आहेत.

Shiv Sena : ..तर चंद्राबाबूंना ‘इंडिया’चा पाठींबा

एकंदरित महाआघाडी आणि महायुती कशी रणनिती आखतात, त्यावर पुढील चित्र अवलंबून राहण्याची शक्यता आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे महायुती किंवा महाआघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुका जिंकणे हेच महायुतीपुढे लक्ष्य राहणार आहे.असे असले तरी येथे विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!