महाराष्ट्र

Deepak Kedar : भाजपऐवजी अपक्ष लढल्या असत्या, तर पराभव झाला नसता

Beed News : महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा प्रयत्न

Lok Sabha: बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार होत्या म्हणून पराभूत झाल्या. असे वक्तव्य ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे. पंकजा मुंडे या जर अपक्ष उमेदवार असत्या तर त्यांना दलित मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाचे सुद्धा मतदान मिळाले असते आणि निवडणुकीत त्यांचा विजय झाला असता. असा दीपक केदार यांनी केला आहे. 

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी मुंडेंना पराभूत करून विजय प्राप्त केला आहे. अत्यंत अटितटीच्या या लढतीत सोनवणे यांनी बाजी मारली. संपूर्ण राज्याच या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. पंकडा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांनी बजरंग सोनवणे यांच्याच झोळीत मतांचं दान टाकल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली.

बीडच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पंकजा मुंडे या भाजपऐवजी अपक्ष उमेदवार असत्या तर त्यांना नक्कीच विजय प्राप्त झाला असता. मुंडेंच्या पराभवाला भाजपच कारणीभूत आहे. महायुतीतील भाजपचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, असे विधान ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी 15 जून शनिवारी केले आहे.

या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपने दोनवेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती.

Mahavikas Aghadi : पक्षद्रोहींना स्वीकारणार नाही

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा अजेंडा

राज्यात काहीतरी मोठी घटना घडणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत होत. त्यामुळेच फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली असल्याचा आरोप सुद्धा दीपक केदार यांनी केला आहे. बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा काही कर्मठ विघटनवादी विचारांचा अजेंडा आहे. त्यामुळं आम्ही जातीय सलोखा टिकवण्याची मागणी करत असल्याचे दीपक केदार म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!