Political News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. लोकसभेतील विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यात शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनडीए आघाडीवर निशाणा साधला. याशिवाय महाविकास आघाडीने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही लढविणार असल्याचे जाहीर केले आहे
शरद पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात 18 सभा घेतल्या. एक रोड शो सुद्धा झाला. विधानसभेला सुद्धा जेवढ्या त्यांच्या सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभांवरून टोला लगावला.
लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही 3 पक्ष जरी एकत्र असलो तरी महाराष्ट्रातील आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिष्ट पक्ष, 30 हुन अधिक संघटना आमच्या सोबत होत्या. या सर्वानी मेहनत केली, महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. यापुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही अशाच एकत्रितपणे लढवणार आहोत. पूर्ण ताकदीने एकत्रितपणे आम्ही मैदानात उतरणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सागितले. महारष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा आणि आशीर्वाद दिला, असाच किंवा यापेक्षाही जास्त आशीर्वाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मतदानावरून ठाकरेंचा टोला..
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. नाशिकमधील काळाराम मंदिरात गेल्या नंतर आपण भाजपमुक्त भारत करायचे आहे, असे बोलत होते. देशातील जनतेने आयोध्या आणि राज्यातील मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले. टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लागवला
मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. नेते मंडळी बोलत होती.
या एकीमुळे राजकारणात काय बदल होईल , विरोधक कोणता टोला लावतात राजकारण कसे तापते या बैठकीनंतर चित्र पाहण्याजोगे राहील.