महाराष्ट्र

Nagpur Blast : स्फोटानंतर गडकरींचीही संवेदनशीलता , जल्लोष रद्द

Nitin Gadkari : जाती-धर्मांच्या नाही, तर विकास कामांच्या बळावर निवडून आलो

Nagpur Blast : नागपुरातील धामना येथे घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. स्फोट झालेल्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नक्कीच नागपूरकरांना दुःख झाल आहे. त्यामुळे मी विनंती केली होती, या घटनेमुळे मलाही दुःखद झाल आहे. त्यामुळे स्वागत किंवा रॅली काढू नये. मी मृतकांच्या आत्म्यांना शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

मंत्रालयाविषयी

सात वर्ल्ड रेकॉर्ड आतापर्यंत माझ्या विभागाला मिळालेले आहे. पुढे आणखी जोमाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. जनतेच प्रेम आणि विश्वास ही राजकीय नेत्यासाठी अमूल्य पुंजी असते, मी भाग्यवान आहे. तिसऱ्यांदा नागपूरच्या जनतेने मला निवडून दिले. जात पंथाच्या आधारे मी कधी राजकारण केले नाही. सर्वांचा साथ सर्वांचा विकास या आधारावर मी राजकारण केले. मी नागपूरच्या जनतेचा प्रेम कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी जो प्रेमाने विश्वास दाखवला. पुढल्या काळात यापेक्षा अधिक काम करण्याचा प्रयत्न करेल. असेही नितीन गडकरी म्हणाले.

काय घडली घटना ?

13 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नागपूरातील चारमुंडी या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचं छतही संपूर्णपणे कोसळलं. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रानुसार माहिती आहे. या मृतकांमध्ये चार महिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी सात कर्मचाऱ्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Farmers News : मुख्यमंत्री साहेब, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र होणार का हो?

नागपुर येथील गुप्ता हॉस्पिटलमध्ये सर्व जखमी व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तीला रामनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन पथक तसेच बचाव कार्य यंत्रणा घटनास्थळी सज्ज झाली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!