Political War : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास 24 तासानंतर खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात अनेक मंत्र्यांकडे त्यांची जूनीच खाती कायम ठेवण्यात आली. पंतप्रधान मोदींनी गृहमंत्रालय अमित शहांकडे सोपवले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक मंत्रालय कायम ठेवण्यात आले. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयासह माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्य मंत्री असतील. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आले आहे.एनडीएच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी निशाणा साधला आहे.
Bhandara Gondia : ‘जिंकलं तर आम्ही, हरलं तर तुम्ही’ हे चालणार नाही
राऊत-पूनावाला आमने सामने
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी मंत्रिमंडळात भाजप नेत्यांचे वर्चस्व आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाच्या खाते वाटपावरून समाचार घेतला. बहुतांश मलईदार मंत्रालये भाजप नेत्यांकडे गेली आहेत. तर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे खुळखुळा सोपवण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शहजाद पूनावाला म्हणाले, एनडीएने तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. दुसरीकडे, इंडीया आघाडीत फक्त भ्रष्टाचार, महत्त्वाकांक्षा, गोंधळ आणि निराशा आहे. शपथविधीच्या दिवशी कोणीतरी दिवे बंद करून बसलेले होते, तर कुणाला ट्विटही करता येत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेऊन विक्रम केला आहे. शहजाद पूनावाला म्हणाले, आता या निराशेतून विरोधी पक्षनेते संजय राऊत एनडीएतील घटक पक्षांना मंत्रिपदे देण्यात आल्याचे सांगत आहेत. देशाच्या हिताशी संबंधित असलेली ही मंत्रालये काँग्रेस आणि विरोधकांसाठी डोळ्यात खुपत आहे ते म्हणाले.