RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकासवर्ग द्वितीयचा समारोप सोहळा नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झाला. बेट सराला येथील पिठाधीश रामगिरी महाराज, वर्गाचे सर्वाधिकारी इकबाल सिंह, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांची उपस्थिती होती.
समारोपीय सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जावई तसेच पिरामल समुहाचे संचालक आनंद पिरामल, जिंदाल समुहाचे प्रगुण जिंदाल खेतान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर, भारत बायोटेक लिमिटेडच्या अध्यक्ष डॉ. कृष्णा इला, स्वामी सत्यप्रकाश यांची उपस्थिती होती.
रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी देशभरातून आलेले 936 कार्यकर्ते या वर्गात सहभागी झाले होते. सुरुवातीला स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर देखील सहभागी झाला होता. अभिनते नाना पाटेकर अभिनयासोबतच सामाजिक कार्यासाठीही कायम चर्चेत असतात. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाची मल्हारची संघाच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर लाईमलाईटपासून दूर साधे आयुष्य जगतो. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होती. पण त्याने अभिनेता व्हायचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मल्हार याने मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतले मल्हार याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होती. पण मल्हार याचे स्वप्न पूर्ण होता होता राहिले.
मल्हार चित्रपटात काम करणार होता पण…
मल्हारला कुटुंबातील व्यक्तींप्रमाणेच साधे रहायला आवडते. मल्हार दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण करणार होता. पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यात वाद झाल्यानंतर नाना यांनी मल्हार याला सिनेमात काम करण्यास नकार दिला. सध्या मल्हार नाम फाउंडेशनचे काम करतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समारोप सोहळा रेशीमबाग मैदानावर झाला. विशेष म्हणून मल्हार पाटेकर यांना बोलवण्यात आले.