महाराष्ट्र

BJP News : प्रवीण दरेकरांनी महायुतीतील नेत्यांना दिला सल्ला

Pravin Darekar : अंतर्गत गोष्टी चार भिंतीच्या आतच ठेवाव्यात

Political News महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात, असा सल्ला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या विधानावरून दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे, असे मला वाटत नाही. जर प्रतापराव जाधव यांच्याजागी श्रीरंग बारणे मंत्री झाले असते, तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे आले असते. उगाच काहीही बोलू नये, असे 10 जुनला समाज माध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर म्हणाले.

एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर 

प्रविण दरेकर म्हणाले की, आपण एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंसोबत युती केली. त्याचे सूतोवाच श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. जागांसाठी आपण एकत्र आलो नाही. तशीच भूमिका बारणे आणि सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. महायुतीतील अंतर्गत गोष्टी जाहीरपणे न बोलता समजुन बोलावे, अशी अपेक्षा सर्व महायुतीतील नेत्यांची, प्रवक्त्यांची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता बारणे बोलत आहेत. हे बोलणे योग्य नाही.

अनिल पाटिल बाबद.. 

40 जागांच्या पक्षाला 80 जागा दिल्या तर उद्या शिंदे यांच्या पक्षालाही 80 ते 90 जागा द्याव्या लागणार. असे वक्तव्य अनिल पाटील यांनी केले होते. यावर दरेकर म्हणाले की, हे सूत्र लावले तर आमच्या 105 जागा आहेत. मग आम्हाला 210 जागा द्याव्या लागतील. 370 चे हे विधिमंडळ नाही 288 जागा आहेत. प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि निवडणूक निकालावर पक्षाच्या चार भिंतीत चर्चा व्हाव्यात. जाहीर वक्तव्य टाळावीत, अशी नम्र विनंती प्रविण दरेकर यांनी केली.

अनिल पाटील हे जबाबदार व्यक्ति आहेत. त्यांनी अशा प्रकारचे जाहीर वक्तव्य करणे योग्य वाटत नाही. महायुतीत द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य कुणीही करू नये, अशा सूचना सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्या पाहिजेत. असेही दरेकर म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय.. 

शेतकरी आमच्यावर थोडेफार नाराज होते, आम्ही शेतकऱ्यांना विश्वास दिलाय की, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान मोदी तन, मन, धन सर्वस्व देशाच्या बळीराजासाठी अर्पण करतील हा संदेश सुरुवातीलाच त्यांनी दिला आहे. हे मोदींनी पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर, खुर्चीवर विराजमान होताच पहिली सही शेतकऱ्यांच्या फाईलवर करून सिद्ध केले आहे. येणाऱ्या पाच वर्षात बळीराजा संपन्न कसा होईल आणि त्याची काळजी सरकार कशी घेणार, हे यातून दिसून आले आहे.

नीट परीक्षेविषयी.. 

नीट परीक्षेच्या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भुमिका घेतली आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणा झालेल्या प्रकारात लक्ष घालून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. झालेल्या गोष्टी इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत. सिस्टीमविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

Raj Thackeray : बिनशर्त पाठिंबा, तरीही शपथविधीसाठी नव्हते निमंत्रण 

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे पुन्हा सरकार आले आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीना ठेचून काढून काश्मीर पुन्हा एकदा मुक्त वातावरणात कसे राहील, याची काळजी भाजपचे सरकार घेईल. असे प्रविण दरेकर म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!